Lungs Health: फुफ्फुस हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. फुफ्फुसातून फिल्टर केल्यानंतर ऑक्सिजन आपल्या संपूर्ण शरीरात पोहोचते. मात्र, आजची आपली जीवनशैली पाहता वायू प्रदूषण आणि सिगारेट ओढणे यामुळे अनेकांची फुफ्फुसे कमकुवत होतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला दमा, न्यूमोनिया किंवा टीबीसारखे जीवघेणे आजार होतात. अशा परिस्थितीत, आपल्या फुफ्फुसांची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. तुम्हाला जर तुमच्या फुफ्फुसाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रोज व्यायाम करा आणि चांगला आहार ठेवा. आज आपण अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे फुफ्फुसांचे आरोग्य चांगले ठेवतात. (Food For Lungs Health)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सफरचंद (Apple) 
आपल्या रोजच्या आहारात एक सफरचंद खाल्यानं फुफ्फुसं हेल्दी ठेऊ शकतो. सफरचंदात असणारे व्हिटामिन्स हे फुफ्फुसांना हेल्दी बनवतात. त्यामुळे देखील डॉक्टर रोज सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. 


आले (Ginger)
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, जे फुफ्फुसात असलेला प्रदूषणाची सगळी घाण बाहेर काढण्यास मदत करते. याच्या सेवनानं फुफ्फुसातील ऑक्सिजनचं सर्कुलेशन खूप चांगल्या पद्धतीनं होतं. (Lungs Good Health) 


हेही वाचा : आधी Miscarriage आणि मग घटस्फोट 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं असं काही की वाचून तुम्हालाही बसेल धक्का


अंबाडी बिया (Falx Seeds) 
जवसाच्या बियांच्या सेवनाने फुफ्फुसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते. एवढेच नाही तर फुफ्फुसांचे खराब झालेले भाग जवसाच्या बियांनी भरून काढण्यासही मदत होते.


अक्रोड (Walnuts)
अक्रोड या ड्रायफ्रूटमध्ये ओमेगा-2 फॅटी अॅसिड्स मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे फुफ्फुसाच्या समस्यांपासून सुटका मिळते. एका रिपोर्टनुसार, दररोज मूठभर अक्रोड खाल्ल्याने श्वसनाच्या समस्या दूर होतात. (Lungs Oxygen) 


फॅटी फिश (Fatty Fish)
फॅटी फिश फुफ्फुसासाठी फायदेशीर आहे, कारण त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स मोठ्या प्रमाणात आढळतात. (Lungs) 


ब्रोकोली (Broccoli) 
फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी ब्रोकोली प्रभावी आहे. याशिवाय ब्रोकोलीच्या सेवनाने शरीराचा स्टॅमिनाही वाढतो. (Know About Lungs Health and Which Food To Eat)


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)