Male Infertility Causes Low Sperm Count :  फीट राहायला कोणाला आवडत नाही. तुम्ही देखील फीट आणि फाईन राहण्यासाठी जीममध्ये (GYM) भरपूर मेहनत करत असाल. अशावेळी काही काहीजण गरजेपेक्षा जास्त व्यायाम (Exercise) करतात. मात्र तुम्हाला माहितीये का? अतीप्रमाणात करण्यात येणारी कोणतीही गोष्ट वाईट असते, जसं की व्यायाम देखील. अती प्रमाणात व्यायाम (Heavy Workout) करणं पुरुषांसाठी धोकादायक ठरू शकतं. जर पुरूष हेवी वर्कआऊटसोबत स्टेरॉयड्सचा देखील वापर करत असतील तर त्यांना Infertility सारख्या गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो. आयव्हीएफ तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, दीर्घकाळ कठोर व्यायाम केल्यामुळे स्पर्म्सची संख्या कमी होते. परिणामी पुरुषांची मुलं जन्माला घालण्याची क्षमता कमी होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंध्यत्व म्हणजेच Infertility वाढवणारा आणखी एक घटक कारणीभूत असतो, तो म्हणजे बॉडी बिल्डिंगसाठी स्टेरॉइड्सचा वापर. स्टेरॉइड्सच्या वापरामुळे झूस्पर्मिया नावाचा आजार होतो. झूस्पर्मियामुळे स्पर्म्स तयार होण्यात शकत नाहीत. नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलंय की, सुमारे एक टक्का भारतीय पुरुष झूस्पर्मिया या आजाराने ग्रस्त आहेत.


IVF तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे “अशी अनेक लोकं आहेत जे फीट राहण्यासाठी दीर्घकाळ जीममध्ये घालवतात. यावेळी ते हेवी वर्कआऊट करतात. परिणामी यामुळे पुरुषांच्या शरीरातील स्पर्म्सची संख्या कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत थकवा आल्यावर स्पर्म्सची संख्या कमी होऊ लागते. मध्यम व्यायाम करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत जास्त व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये यांच्या संख्येचं प्रमाण कमी दिसून येतं."


पुरुषांमधील इन्फर्टिलीटीची लक्षणं


पुरुषांमधील इन्फर्टिलीटीची मुख्य लक्षणं म्हणजे पार्टनरला गर्भधारणा न होणं. मात्र, काही वेळा पुरुषांमधील समस्या इन्फर्टिलीटीचं कारण बनू शकतात. जाणून घ्या यासंदर्भातील लक्षणं-


  • अंडकोषभोवती वेदना किंवा सूज येणं

  • पुरुषांच्या स्तनांमध्ये असामान्य बदल होणं

  • सतत रेस्पिरेटरी इंफेक्शन होणं

  • चेहऱ्यावरील किंवा शरीरावरील केसांमध्ये घट होणं

  • स्पर्म काऊंट कमी होणं


पुरुषांमध्ये इन्फर्टिलीटी होण्याची कारणं


  • कमी स्पर्मचं प्रोडक्शन

  • धुम्रपानासारखी वाईट सवयी

  • स्पर्मच्या नलीकेत अडथळा

  • दीर्घकालीन आजार