मुंबई : कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहे. कॅन्सर या आजाराचं नाव ऐकूकनच अनेकांना त्याबद्दल भीती वाटते. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे कोणलाही आणि कोणत्याही टप्प्यावर कॅन्सरचं निदान होतं. कॅन्सरचे उपचारही वेदनादायी असल्याने वेळीच निदान न झाल्याने भारतामध्ये 10 लाख रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रगत विज्ञान आणि औषधोपचारांमुळे कॅन्सरचे उपचार आता आवाक्यात येत आहेत. मात्र लवकरच कॅन्सरमुळे जीव गमवावा लागणार नाही. छत्तीसगडच्या एका संशोधनामध्ये कॅन्सरवर प्रभावी उपचारपद्धती समोर आली आहे.शरीराची ही ८ लक्षणे देतात कॅन्सराचा इशारा!



कॅन्सरशी सामना करणं होणार सुकर 


रायपूरच्या ममता त्रिपाठीने कॅन्सरवर नवं औषध शोधून काढलं आहे. ममताच्या दाव्यानुसार, या औषधामुळे 70 ते 80 % कॅन्सर सेल्सचा नाश करणं शक्य होणार आहे. ममताने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या औषधाची सुरूवातीला लॅब टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट यशस्वी ठरली. आता हे औषध उंदरांवर टेस्ट केले जाईल. उंदरांवर केलेल्या प्रयोगावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात मनुष्यावरही हे औषध वापरण्यात येणार आहे. 


ममता त्रिपाठीला या औषधाचा शोध लावण्यासाठी सुमारे 4-5 वर्षांचा कालावधी लागला आहे. ममताच्या प्रयत्नांना यश मिळाल्यास अनेकांसाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट ठरणार आहे. कारण कॅन्सर हा अनेकदा अंतिम टप्प्यात पोहचल्यानंतर निर्दशनास येतो. त्यामुळे कॅन्सरवर मात करण्यासाठी मानसिक आणि शारीरिकरित्या सक्षम राहून उपचारांचा सामना करण्यासाठी धैर्य लागतं. सावधान ! नेहमीच्या सवयीतील या '5' गोष्टी नकळत वाढवतात कॅन्सरचा धोका