54 वर्षांच्या मनोज वाजपेयीचे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन, इंटरमिटेंट फास्टिंग ठरलं महत्त्वाचं
Manoj Bajpayee Transformation : गेल्या 12 वर्षापासून डिनर न केलेल्या अभिनेता मनोज वाजपेयीने दाखवला जबरदस्त बदल. सिक्स ऍपमधल्या मनोज वाजपेयीने जीवनात `ही` गोष्ट कटाक्षाने पाळली.
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सगळ्यांना थक्क केलं आहे. वयाच्या 54 व्या वर्षी सिक्स पॅक असा जबदस्त ट्रान्सफॉर्मेशन दाखवला आहे. नवीन वर्षात अभिनेता मनोज वाजपेयीने एब्स फ्लॉन्ट तर केलेच पण तो एवढ्यावरच थांबला नाही शर्टलेस मनोजने यंगस्टर्सला मागे टाकलं आहे.
54 वर्षीय मनोज बाजपेयी यांनी अशी बॉडी बनवली आहे की त्यांचे चाहतेही हैराण झाले आहेत. अभिनेत्याने 1 जानेवारी 2024 रोजी फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. शर्टलेस लूकमध्ये मनोजचे किलर ऍब्स पाहण्यासारखे होते. आपल्या ऍब्सने तो अजूनही तरुण स्टार्सना मात देऊ शकतो हे त्याने सिद्ध केले आहे. मनोज बाजपेयी यांनी सोमवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा फोटो शेअर केला. फोटोमध्ये 'सत्या' अभिनेता कॅमेऱ्यासमोर शर्टलेस पोज देताना दिसला. अभिनेत्याने त्याचे किलर ऍब्स देखील दाखवले. फोटो शेअर करताच मनोज बाजपेयी सोशल मीडियावर लोकप्रिय झाला.
मनोज वाजपेयीला abs कसे मिळाले?
मनोज वाजपेयीनेही शर्टलेस फोटो शेअर करून आपल्या फिटनेसचे रहस्य उघड केले आहे. त्याने सांगितले आहे की अशी कोणती गोष्ट आहे जी खाऊन अभिनेत्याने इतके अप्रतिम शरीर बनवले आहे. कॅप्शनमध्ये मनोजने लिहिले, "नवीन वर्ष, नवीन मी. माझ्या शरीरावर स्वादिष्ट सूपचा प्रभाव पहा. हा एक किलर लुक आहे, नाही का?"
जवळपास 12 वर्षांपूर्वीच सोडलं डीनर
एका डॉक्टरांनी मनोजला 'रात्रीचे जेवण लवकर खा, नाहीतर अन्न पोटातच सडेल', असे सांगितले. यानंतर अभिनेता खूप घाबरला आणि त्याने रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद केले. NCBI वर उपलब्ध संशोधन (संदर्भ) असेही म्हणते की जे लोक रात्री झोपण्यापूर्वी लवकर डिनर करतात त्यांना लठ्ठपणाचा धोका कमी असतो.
आजोबांचा डाएट महत्त्वाचा
मनोज वाजपेयी यांनी त्यांच्या आजोबांबद्दल सांगितले की, ते बारीक असले तरी तंदुरुस्त होते. त्यांनी त्यांच्या आहारातून प्रेरणा घेतली आणि त्यांच्यासारखाच आहार पाळला. यामुळे तो खूप उत्साही आणि निरोगी वाटू लागला. यानंतर तो हळूहळू रात्रीचे जेवण टाळू लागला.
इंटरमिटेंट फास्टिंग
डाएटिंगच्या या पद्धतीला इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात. मनोज वाजपेयीने या इंटरमिटेंट फास्टिंगबाबत सांगितले की, संध्याकाळी कधीही खात नाही. अशा पद्धतीने इंटरमिटेंट फास्टिंग केल्याने शुगर, कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकसारखे आजार दूर राहातात. मनोजने सांगितल्यानुसार, १२ तासाच्या Intermittent Fasting मुळे जास्त फायदा मिळतो. मनोजने अनेकांना इंटरमिटेंट फास्टिंगसाठी प्रवृत्तही केले आहे. साधारण १२ -१४ तास न खाता रात्रीचे अजिबात न जेवणे यामुळे शरीराला अधिक चांगला फायदा होतो असंही त्याने सांगितलं आहे.