Measles Outbreak in Mumbai: मागील काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रणाणात गोवरचे (Measles) रुग्ण आढळले. हा प्रादुर्भाव वाऱ्याच्या वेगानं मुंबईतही (Measles in mumbai) पसला आणि आता प्रौढांनाही त्यामुळं धोका उदभवू लागला आहे. मुंबईच्या एम पूर्व प्रभागामध्ये 18 आणि 22 वर्षांच्या दोन व्यक्तींची नावं गोवरचे संशयित रुग्ण म्हणून नोंद करण्यात आली.  त्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.


सध्याची स्थिती काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत आणखी एका बालकाचा गोवरने मृत्यू (measles death child) झाल्याची माहिती समोर आली आहे. गोवंडीतील सव्वा वर्षाच्या मुलीचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झालाय. मुंबईत गोवरमुळे मृत बालकांची संख्या पोहचली 10 वर पोहोचली आहे. आज गोवर आजाराने बाधित 24 मुलांची भर पडली असून एकूण बाधित रूग्णांची संख्या 208 वर पोहचली आहे.


गोवरची लागण केवळ लहान मुलांमध्येच नसून प्रौढांमध्येही या संसर्गाची ( Measles infection in adults )  लागण होताना दिसतंय. रुग्णांना लक्षणाधारित उपचारासह अ जीवनसत्त्वाची (Vitamin A) मात्रा देण्यात आली. आता या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र गोवराच्या संसर्गाची लागण लहान बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही होतेय का?, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 


आणखी वाचा - Health News : प्रौढांनो सतर्क व्हा! 'हा' संसर्ग तुम्हालाही होऊ शकतो, वाचा आरोग्याच्या दृष्टीनं मोठी बातमी


दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या निकषांनुसार... ज्या भागामध्ये गोवरच्या (Measles symptoms) संशयित रुग्णांमध्ये अंगावर पुरळ, ताप अशी लक्षणं दिसून येतात, अशा परिसरातील पाच नमुने वैद्यकीय विश्लेषणासाठी पाठवण्यात येतात. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाचपैकी दोन नमुन्यांमध्ये गोवर असल्याचं (Measles Outbreak in Mumbai) निष्पन्न झाल्यास या परिसरात गोवराचा उद्रेक असल्याचं घोषित केलं जातं.