Breast Cancer : अनेकदा स्त्रियांना स्तनाचा कॅन्सर झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. परंतू पुरुषांना देखील स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. पुरुषांचे स्तन महिलांसारखे पूर्णपणे विकसित होत नाहीत, परंतू त्यामध्ये स्तनाच्या टिशू असतात. पुरुषांच्या दुधाच्या नलिकांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer In Men) होण्याची शक्यता असते. याला डक्टल कार्सिनोमा (Ductal Carcinoma) असं म्हणतात. फार कमी पुरुषांमध्ये असा प्रकार आढळून येतो. (Men can get breast cancer too know the symptoms health news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्करोगाची (Cancer) सुरुवात दूध उत्पादक ग्रंथींमध्ये होते, ज्याला लोब्युलर कार्सिनोमा म्हणतात. स्तनाच्या कर्करोगाच्या सर्व प्रकरणांपैकी फक्त 1 टक्के पुरुषांमध्ये आढळतात. 2015 मध्ये, पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची सुमारे 2350 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी सुमारे 440 पुरुषांना या आजाराने आपला जीव गमवावा लागला. 


पुरुष स्तनाच्या कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि उशीरा डॉक्टरकडे जातात, त्यामुळे मृत्यूदर (Mortality Rate) वाढल्याचं पहायला मिळालं आहे. तुमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी कोणाला स्तनाचा कर्करोग (Breast cancer) झाला असेल, तर तुम्हाला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो, अशी माहिती समोर आली होती.


धोका कोणाला आहे?


तरुण पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, परंतु वयानुसार धोका वाढतो. अंडकोष (Orchitis) जळजळ झाल्यास पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त, ऑर्किटिस शस्त्रक्रियेनंतर देखील स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. पूर्वजांमध्ये आढळणारे उत्परिवर्तित जनुकांमुळे (BRCA2) तुम्हाला स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका असतो.


लक्षणं काय आहेत?


पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे महिलांसारखीच असतात. स्तनाची गाठ हे कर्करोगाचं प्रमुख लक्षण दिसून येतं. एका स्तनाचा आकार वाढणे, स्तनाग्र (Nipple) दुखणे, स्तनाग्रावर फोड येणं त्याचबरोबर उलटं स्तनाग्र हे देखील पुरुषांच्या स्तनाच्या कर्करोगाची लक्षणं (Symptoms of breast cancer) आहेत.


जेव्हा पुरुषाचे दोन्ही स्तन मोठे होतात तेव्हा त्याला गायनेकोमास्टिया म्हणतात (Gynecomastia). या स्थितीमुळे कर्करोग होण्याची शक्यता नसते. मात्र, योग्यवेळी डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याची गरज असते.