महिलांनाच नाही तर पुरुषांनाही होऊ शकतं Urine Infection, लक्षण ओळखा अन्यथा किडनी निकामी होण्याची भीती
Causes of UTI in men : महिलांनाच नाही तर पुरुषांनाही यूरिन इन्फेक्शन होऊ शकतं. फक्त फरक आहे की पुरुषांना कधीही यूटीआय झाला आहे हे लक्षात येतं नाही. त्यामुळे तो वेगाने वाढतो आणि किडनीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
Causes of UTI in men : लघवी करताना जळजळ, तीव्र वेदना, मळकट रंगांची लघवी, पाठ आणि कंबरदुखी, ताप हे सर्व लक्षण म्हणजे यूरिन इन्फेक्शनचे असतात. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) म्हणजेच यूरिन इन्फेक्शन ही महिलांमध्ये सामान्य आजार मानला जातो. महिलांना वरील लक्षण दिसल्यास मूत्रसंसर्ग झालाय हे स्पष्ट होतं. (men urine infection symptoms uti causes kidney failure )
भारतीय महिलांमध्ये यूरिन इन्फेक्शनचे प्रमाण अधिक दिसतं. काही महिलांना दोन तीन महिन्यातून यूरिन इन्फेक्शनचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला माहितीय का पुरुषांनाही UTI होऊ शकतो? महत्त्वाच म्हणजे पुरुषांना आपल्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालंय हेच मुळात लक्षात येतं नाही. प्रत्येक 25 पैकी 3 पुरुषांना त्यांच्या आयुष्यात UTI चा त्रास झालाय.
UTI होण्यामागे कोलाय बॅक्टेरिया हे कारण आहे. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना यूटीआय होण्याची शक्यता अधिक असते. मात्र तरुण पुरुषदेखील गेल्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण वाढलेलं दिसत आहे. पुरुषांना आपल्याला यूरिन इन्फेक्शन झाल आहे हे लक्षातच येत नाही. त्यामुळे अनेक वेळा याचा थेट परिणाम त्यांचा किडनीवर होण्याची शक्यता वाढते.
पुरुषांमध्ये यूटीआयची लक्षणं
लघवी करताना वेदना
वारंवार लघवी करण्याची इच्छा
मूत्रमध्ये रक्त
लघवीचा रंग किंवा गंध बदलणे
पाठ किंवा पोटदुखी
थंडी वाजून ताप येणे
पुरुषांमध्ये यूटीआयचे प्रकार
सिस्टिटिस: सिस्टिटिस हा मूत्राशयाचा संसर्ग असून हा पुरुषांमध्ये सामान्य आहे. लघवी करताना वारंवार जळजळ होते.
मूत्रमार्गाचा दाह: ही स्थिती मूत्रमार्गावर विपरित परिणाम करते, ज्यामुळे जळजळ होते आणि लघवी करताना स्त्राव होतो.
पायलोनेफ्राइटिस: हा संसर्ग मूत्रपिंडात होतो. यामध्ये पुरुषांना कंबरदुखी, मळमळ यासोबतच ताप येतो.
पुरुषांमध्ये यूटीआय का होतात?
पुरुषांमध्ये यूटीआयचे मुख्य कारण मोठे प्रोस्टेट आहे. 50 पेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये वाढलेले प्रोस्टेट मूत्राशयातून लघवीच्या प्रवाहात अडथळा आणतो. ज्यामुळे यूटीआयची शक्यता वाढते. अनियंत्रित मधुमेह किंवा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करणारे रोग देखील UTI च कारण ठरु शकतं. याशिवाय, क्लॅमिडीया आणि गोनोरिया सारखे लैंगिक संक्रमित रोगामुळेही यूटीआय होतो.
दुर्लक्ष करु नका!
महिला आणि पुरुषांनी यूटीआयकडे दुर्लक्ष करू नये. UTI किती गंभीर आहे हे बॅक्टेरियाच्या प्रकारावर अवलंबून असतं. लहान मुलं, वृद्ध, कर्करोगाचे रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांनी शक्य तितक्या लवकर UTI साठी उपचार घेतले पाहिजे.
UTI टाळण्याचे मार्ग
लघवी रोखू नका
दिवसातून 6 ते 8 ग्लास पाणी प्या
प्रोबायोटिक्स आणि व्हिटॅमिन सी समृद्ध क्रॅनबेरी ज्यूस
लिंबूवर्गीय फळं UTI टाळण्यास मदत करतात
पुरुषांनी स्वच्छतेची खूप काळजी घेतली पाहिजे.
जननेंद्रियाचे क्षेत्रावर पावडर आणि फवारण्यांचा वापर कमीत कमी करणे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)