Contraceptive Pills For Men : महिलाच नव्हे, आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळी; 30 ते 60 मिनिटांत करणार काम
Contraceptive Pills For Men : ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. तंत्रज्ञान खरंच इतकं पुढे गेलं आहे की आता पुरुषांसाठीसुद्धा शुक्राणूंचा वेग कमी करणाऱ्या गोळ्यांचा शोध लावण्यात आला आहे.
Contraceptive Pills For Men : नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी सहसा विविध मार्गांचा अवलंब केला जातो. मग ते (Condoms) कंडोम असो किंवा गर्भनिरोधक गोळ्या. त्यातही आता महिलांच्या कंडोमचीही जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. ही चर्चा आणि याविषयीचं कुतूहल कमी होत नाही तोच आणखी एक महत्त्वाची आणि तितकीच लक्षवेधी माहिती समोर आली आहे. ही माहिती म्हणजे, पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळ्यांविषयीची.
आतापर्यंत तुम्हीआम्ही महिलांसाठी असणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांविषयी ऐकलं असेल, पण आता पुरुषांसाठीसुद्धा गर्भनिरोधक गोळ्या विकसित केल्या गेल्या आहेत. (sperms) शुक्राणूंचा वेग कमी करणारी ही गोळी Pre Clinical Models ची मधून आता पुढच्या टप्प्यात आली आहे.
हेसुद्धा वाचा : Condom For Woman : महिलांसाठीही कंडोम, याबद्दल कधी ऐकलंय का ?
ऐकताना ही बाब काहीशी आश्चर्यकारक वाटेल पण, हे खरंय. पुरुषांसाठीची ग्रभनिरोधक गोळी वापरात आल्यास ही मोठी क्रांती असेल. याविषयीचा संपूर्ण अहवाल जर्नल नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. अभ्यासकांच्या मते हे संशोधन Game Changer असेल. सध्याच्या घडीला पुरुष कंडोम आणि नसबंदी याच उपायांचा वापर करतात. पण, ही गोळी यात बरेच बदल करेल. दरम्यान यावरील संशोधन अद्यापही पूर्ण झालेलं नाही. यापुढे ही गोळी मानवी चाचण्यांपर्यंत पोहोचल्यास यापुढे ती वापरातही आल्यास आश्चर्य वाटायला नको.
गोळीनं कसं काम केलं?
संशोधन सुरु असतानाच या गोळीची चाचणी उंदरांवर करण्यात आलीय यावेळी त्यांच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. ज्यानंतर गोळीमुळं शुक्राणू निष्क्रीय करण्याची क्षमता असल्याचं स्पष्ट झालं. पुढे 24 तासांनंतर शुक्राणूंची हालचाल पूर्ववत झाली.
संशोधकांसोबत काम केलल्या डॉ. मेलानी बालबॅच यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गोळी घेतल्यानंतर ती साधारण अर्ध्या ते एक तासात शरीरावर परिणाम करु लागते. इतर औषढांच्या तुलनेत ही गोळी कमी वेळातच प्रभाव दाखवण्यास सुरुवात करते अशी बाबही यावेळी समोर आली आहे.