Menopause Risk For Diabetes Patient: मधुमेहाच्या रुग्णांना त्यांची साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ठराविक पदार्थांचे सेवन कमी करण्यास सांगितले जाते. सर्व प्रकारचा सकस आहार, चांगली झोप आणि दैनंदिन व्यायामाचा सल्ला दिला जातो. या ठराविक प्रकारच्या पदार्थांचे सतत सेवन केल्याने साखर नियंत्रणात ठेवता येते. तुम्ही साखर नियंत्रणात ठेवू शकता. पण तुम्हाला माहीत आहे का की मोनोपॉझमुळे (Menopause) रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होऊ शकते? त्याचा वाईट परिणाम Diabetes रुग्णांमध्ये दिसून येतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण काय?


आपल्या शरीरात हार्मोन्स फार महत्त्वाची भुमिका निभावत असतात. तुमच्या शरीरात बदल हे अधिकतम तुमच्या हार्मोन्सवर अवलंबून असतात. इस्ट्रोजेनचं प्रमाण कमी झाल्यावर महिलांना Menopause चा धोका निर्माण होतो. यामुळे महिलांना 12 महिने मासिक पाळी येत नाही. तेव्हा त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो.


गरोदरपणात इस्ट्रोजेन महत्त्वाची भूमिका बजावतं. या इस्ट्रोजनच्या कार्यामुळे दर महिन्याला मासिक पाळी येते. इस्ट्रोजेनची पातळी कमी झाली तर त्यात इन्सुलिनचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते आणि ज्याने साखरेचेही प्रमाण वाढू शकते.


अशावेळी आपण काय करावे? 


- तुम्ही तुमचा आहार अधिक मजबूत करण्यावर भर द्यावा. जेणेकरून तुम्हाला भरपूर फायबर, मॅक्रोन्यूट्रिएंट्स प्रोटीन मिळतील. ज्यामध्ये कमी कॅलरीज आहेत असे पदार्थ खाण्यावर भर द्या. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचाही सल्ला घेऊ शकता.


- जर तुमच्याकडे जिमला जाण्यासाठी वेळ नसेल. तर निदान तुम्ही दररोज 60-90 मिनिटे चाला. चालणं वजन कमी करण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. 


- जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुमचे शरीर हार्मोन्स तयार करते. जे इंसुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवण्याचे काम करते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी भरपूर झोप घ्या, पाणी प्या, आणि दररोज व्यायाम किंवा ध्यान करा.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती अवलंबण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. 'ZEE 24 तास' याची पुष्टी करत नाही.)