डायबिटिसच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय असलेली मेथी, या लोकांनी चुकूनही खाऊ नये
Methi Side Effects : कोणताही पदार्थ योग्य माहिती करुन मगच खाणे फायदेशीर असते. मधुमेहींसाठी मेथी गुणकारी आहे मात्र उन्हाळ्यात सगळ्यांनीच मेथीचं सेवन करणे शरीरासाठी घातक ठरु शकते.
आयुर्वेदानुसार, मेथी हे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अतिशय गुणकारी आहे. दररोज मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून घालून सकाळी उपाशी पोटी मेथीचे दाणे आणि पाणी प्यावे यामुळे डायबिटिस कंट्रोलमध्ये राहतो. जरी मेथीचे असंख्य फायदे असले तरीही काही खास लोकांनी मेथीला आहारापासून लांबच ठेवावे. त्यामध्ये कोणत्या व्यक्तींचा समावेश आहे आणि त्यांनी का खाऊ नये हे समजून घेणे गरजेचे आहे.
गरोदर स्त्रिया
गरोदर महिला पचनक्रिया चांगली होण्यासाठी मेथी आणि मेथीचे पाणी पितात. मात्र रिसर्च नुसार, मेथीच्या पाण्यामुळे गर्भपात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळेच मेथी गरोदरपणात खाण्यापासून स्वतःला रोखलं पाहिजे. तसेच स्तनपान करणाऱ्या मातांनी देखील मेथी खाऊ नये. यामुळे बाळाला गॅस किंवा पोट दुखीची समस्या जाणवू शकते.
युरिनमधून वास येणे
अनेकांना युरिनमधून वास येण्याची समस्या जाणवते. त्या लोकांनी आपल्या आहारातून मेथीचे दाणे हद्दपार करावे.
ब्लड शुगरची समस्या
मधुमेह कंट्रोल करण्यासाठी तुम्ही मेथी खात असाल तर डॉक्टरांचा सल्ला पहिला घ्या. कारण मेथीच्या पाण्यामुळे ब्लड शुगर वाढण्याची दाट शक्यता आहे. यामुळे हायपोग्लाइसेमिया होण्याची दाट शक्यता असते.
अस्थमा
अस्थमाचा त्रास असणाऱ्या लोकांनी मेथी आणि मेथीच्या पाण्याचे सेवन करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच त्वचेची समस्या असेल तरीही मेथी खाणे टाळा. एवढंच नव्हे तर काही लोकांना मेथी खाल्ल्यामुळे अनेकांना श्वसनाची समस्या जाणवते.
पोटाचा त्रास
सतत मेथीचे सेवन केल्यामुळे काही लोकांना बॅक्टेरियाची समस्या जाणवते. यामुळे गॅस होणे, पोट दुखी, उल्टी आणि मळमळ यासारख्या समस्या जाणवतात. अनेकांना मेथी पोटात गेल्यावर ती गरम पडते. यामुळे जुलाब देखील होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात मेथी अजिबातच खाऊ नका.
पचनाची समस्या
भिजवलेल्या मेथीचे दाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. जास्त प्रमाणात मेथीचे दाणे खाल्ल्याने उलट्या, जुलाब, सूज येणे आणि काही प्रकरणांमध्ये चक्कर येणे यासारख्या पाचन समस्या उद्भवू शकतात.
रक्तातील साखरेची पातळी कमी होणे
मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, जर तुम्ही मोठ्या प्रमाणात बियांचे सेवन केले तर रक्तातील साखरेची पातळी वेगाने खाली जाऊ शकते.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)