एवढ्या वेळेस सूर्यनमस्कार, १ मिनिटात एवढे पुशअप्स, सकाळी एवढा फलाहार; मिलिंद सोमणचा फीट फंडा
फिटनेस फ्रिक मिलिंद सोमेन त्याच्या फिटनेसचा अनुभव इन्स्टाग्रामवर नेहमीच शेअर करत असतो.
मुंबई : सेलिब्रिटी फिटनेस म्हटलं की, मिलिंद सोमणंचं नाव हमखास घेतलं जातं. मिलिंद एक असा मॉडल आणि अभिनेता आहे जो वयाच्या 55 व्या वर्षातही फीट आणि फाईन आहे. त्याचे फिटनेस वर्कआउट, फिटनेस रुटीन, डाएट इन्स्टाग्रामवर शेअर करून त्याने आतापर्यंत अनेक लोकांना प्रेरणा दिली आहे. नुकतंच त्याने मुंबईतील शिवाजी पार्क ते गुजरातच्या स्टॅच्यू ऑफ यूनिटीपर्यंत 420 किलोमीटरता प्रवास अनवाणी 8 दिवसांपर्यंत पूर्ण केला.
फिटनेस फ्रिक मिलिंद सोमेन त्याच्या फिटनेसचा अनुभव इन्स्टाग्रामवर नेहमीच शेअर करत असतो. त्यांच्या मते, अंतर 400 किमी, 100 मीटर असले तरीही काही फरक पडत नाही. फरक पडत असेल तर तो फक्त प्रयत्नांमध्ये आहे. मी प्रयत्न केले आणि माझे ध्येय साध्य केलं.
मिलिंदने लाइव्ह चॅटमध्ये त्याच्या वर्कआउटचं सिक्रेटंही शेअर केलं. त्याने सांगितले की, फिटनेसचा अर्थ बायसेप्स किंवा ट्रायसेप्स असा असू नये. फिटनेस म्हणजे कधीही काहीही करण्यास सक्षम असणं. मी मायक्रो वर्कआउट करतो. एका वेळी 30 सेकंद ते 3 मिनिटांच्या दरम्यान.
मी दररोज सुमारे 15-20 मिनिटं व्यायाम करतो. मला दररोज 30 सूर्यनमस्कार करायला 7 मिनिटं लागतात. तर मी एका मिनिटाला 60 पुशअप्स करतो आणि स्वत:ला 62 पर्यंत नेण्यास प्रवृत्त करतो, असंही मिलिंद म्हणालाय.
मिलिंदच्या डाएट पाहिल्यावर असं वाटतं की, तो डाएटसाठी कठोर नियमांचं पालन करत नाही. मिलिंदने सांगितलं की, "मी कधीही खाणं मोजू मापून खात नाही. तसंच कॅलरीजही कधीही मोजत नाही. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणत्याही खास डाएटचं पालन केलं नाही. मी जेवढे खाऊ शकतो तेवढेच मी खातो."
तो पुढे म्हणाला, "हळूहळू मी डाएटमधून साखरेला दूर केलंय. मांसाहार करणंही मी टाळतोय. आता मी शाकाहारी जेवणाला माझं प्राधान्य देतो. मी फक्त चवीसाठी मांसाहारी खातो. एखाद्याचा यावर विश्वास बसणार नाही, पण माझी सकाळ 3 किलो फळांसोबत होते. 5-6 आंबे, 6 केळी इतक्या फळांचा माझ्या आहारात समावेश असतो."