Multigrain Flour: गव्हाच्या चपात्या रोजच्या जेवणात असतात. अनेकांना चपात्याशिवाय जेवण जातच नाही. तसंच, ऑफिसमध्ये व मुलांना शाळेसाठी लागणाऱ्या डब्यात पण रोज चपाती-भाजीच करावी लागते. गव्हाच्या चपात्या तशा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, गव्हाच्या चपात्या तुम्ही अधिक पौष्टिक करु शकता. गव्हाच्या पीठात अधिक तीन प्रकारची पीठं मिसळून तुम्ही चपात्या पौष्टिक बनवू शकता. कोणत्या पीठांचा वापर तुम्ही करु शकता, हे जाणून घेऊया. तसंच, यामुळं आरोग्याला काय फायदा होईल, यावरही एक नजर टाकूया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कणिकेचे पीठ मिळताना त्यात तीन प्रकारचे पीठ मिसळू शकता. गव्हाच्या पीठात हे पीठ मिसळल्यास त्याचे फायदे वाढू शकतात. तुमची चपाती अधिक पौष्टिक व्हावी, असं तुम्हाला वाटत असेल तर हा प्रयोग नक्की करुन पाहाल. यामुळं आरोग्यालाही अधिक फायदे होतात. 


चण्याचे पीठ


चण्याच्या पीठाचा गुणधर्म थंड असतो. तर, तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांत गव्हाच्या पीठात दररोज चण्याचे पीठ मिसळत असाल तर यामुळं उष्णतेमुळं दिलासा मिळू शकतो. शरीरात थंडावा निर्माण होतो. तुम्ही गव्हाच्या पीठात 25 ते 50 टक्क्यांपर्यंत पीठ मिळवू शकता. 


नाचणीचे पीठ 


नाचणी व गव्हाच्या पीठाची चपाती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गव्हाच्या पीठात तुम्ही नाचणीचे पीठ 25 टक्क्यापर्यंत मिसळा त्यानंतर हे पीठ चांगलं मळून त्याची चपाती बनवा. या चपात्या चवीला थोड्या वेगळ्या लागतील मात्र, त्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही हवं तर नाचणी व गव्हाचे पीठ एकत्र करुन एका डब्यातही ठेवू शकता. किंवा दररोज पीठ मळताना त्यात गरजेनुसार नाचणीचे पीठ मिक्स करु शकता. या चपात्यांमुळं हाड मजबूत होण्यास मदत होते. 


सोयाबीन पीठ


घरात लहान लहान मुलं आहेत तर गव्हाच्या पीठात थोडेसे सोयाबीनचे पीठ मिसळा. या चपात्यात प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. त्याचबरोबर यामुळं चपात्याही मऊ राहतात. 2 किलो गव्हाच्या पीठात 500 ग्रॅम सोयाबीनचे पीठ मिसळा. 


गव्हाच्या पीठात नाचणी, सोयाबीन आणि चण्याचे पीठ मिसळून चपात्या केल्यास आरोग्याला भरपूर लाभ मिळतात. जाणून घेऊया सविस्तर


मधुमेहाच्या रुग्णांना नेहमी गव्हाच्या चपात्या खाण्याचा सल्ला दिला जातो. अशातच तुम्ही जर गव्हाच्या पीठात हे पीठ मिसळल्यास ते गव्हाचे कंटेट कमी करते आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप लाभदायक ठरते. हे ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासही फायदेशीर ठरते. 


मल्टीग्रेन पीठात मांसपेशियां व हाडांना बळकटी देण्याचे गुणधर्म असतात. यात प्रोटीन व कॅल्शियमअधिक मात्रात असतात. जे हाडांना व मांसपेशीं मजबूत करतात. 


उत्तम आरोग्यासाठी सर्वाधिक गरजेचे असते ते म्हणजे पाचनतंत्र. हे पीठ तुमचं पाचनसंस्था सुरळीत राहण्यास मदत होते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर गव्हाच्या पीठात हे तीन पीठ मिसळून खा. या पीठांमध्ये फायबर असते ज्यामुळं पचनसंस्था मजबूत होते. तसंच, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)