टॉयलेटही अशी जागा आहे जिथे प्रत्येकाला हवा तो निवांतपणा मिळतो. पण आता तेही मोबाईलच्या व्यसनापायी मिळणं कठीण झालं आहे. अनेकांना टॉयलेटमध्ये तासन् तास मोबाइल घेऊन बसण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्याच्या दृष्टीकोनातून अतिशय घातक असल्याच म्हटलं जातं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या टेक्सास युनिर्व्हसिटी साऊथ वेस्टर्न मेडिकल सेंटरच्या कोलोरेक्टल सर्जन, डॉ. लाई जुएच्या माहितीनुसार, अधिक काळ रुग्णालयात बसल्यामुळे ब्लड सर्क्युलेशनची समस्या उद्भवते. तसेच अनेकांना पाईल्सचा त्रास देखील वाढला. 


असिस्टेंट प्रोफेसर आणि इन्फ्लेमेटरी बॉवेल डिजीज सेंटरच्या डायरेक्टर डॉ. फराह मोंजूर यांच्या माहितीनुसार, टॉयलेटवर 5 ते 10 मिनिटाहून अधिक काळ बसणे अयोग्य आहे. अधिक काळ बसल्यास पोट आणि मलद्वार यांच्या जवळच्या नसांवर एक्स्ट्रा दबाव पडतो ज्यामुळे नसा सुजतात आणि पाइल्स किंवा इतर समस्यांचा त्रास होतो. 


जास्त काळ बसण्याचा धोका 


खूप वेळ टॉयलेटमध्ये बसल्यास पेल्विक फ्लोर मसल्स कमकुवत होतात. ज्यामुळे मल बाहेर पडण्यास अडचणी निर्माण होतात. यासोबतच खूप वेळ बसल्यास रेक्टल प्रोलेप्सचा धोका सर्वाधिक वाढतो. ज्यामध्ये मोठे आतडे बाहेर येण्याची शक्यता सर्वाधिक वाढते. 


फोनचा वापर टॉयलेटमध्ये का करु नये? 


डॉ. मोजूंर यांच म्हणणं आहे की, फोन किंवा पुस्तकं टॉयलेटमध्ये घेऊन गेल्यामुळे ती व्यक्ती टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसतात. यामुळे शरीरात अनावश्यक ताण निर्माण होतो. टॉयलेटमध्ये जितकं कमी वेळ बसाल ते जास्त फायदेशीर आहे. अनइंटरेस्टिंग जागा असल्याच मान्य करा कारण तेथे 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणे घातक असते. यामध्ये पोटातील स्नायू सक्रिय होतात आणि मूव्हमेंट अधिक सहज होतात. 


अधिक पानी आणि फायबर घ्या 


तज्ज्ञांच्या मते, पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आणि फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते. एखाद्याने दररोज 2.7 ते 3.7 लिटर पाणी प्यावे आणि 14 ग्रॅम फायबर प्रति 1,000 कॅलरीज अन्नात घेतले पाहिजे. यामुळे बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल किंवा शौचाला जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)