नवी दिल्ली : Covid-19 Mild Symptoms: भारतासह जगभरात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, एम्समधील ( AIIMS) एका डॉक्टरांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे वाढत्या प्रकरणांमध्ये, कोविड रुग्णांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, ज्यावर घरी उपचार करणे शक्य आहे. त्याचवेळी, डॉक्टरांनी यावर जोर दिला की अँटी-व्हायरल मोलनुपिरावीर (Molnupiravir) हे कोविड -19 रोगासाठी 'जादूचे औषध' नाही.


संक्रमित उपचार करण्यासाठी सर्वात महत्वाचे काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम्सच्या ( AIIMS) औधष विभागातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल यांनी सांगितले की, कोविड-19 च्या उपचारासाठी आतापर्यंत कोणतेही औषध अस्तित्वात नाही. ते म्हणाले की रुग्णाचे काटेकोर निरीक्षण करणे सर्वात महत्वाचे आहे. विशेषत: उच्च-जोखीम असलेले वृद्ध जे आधीच आजारांच्या विळख्यात आहेत किंवा ज्यांचे अद्याप लसीकरण झालेले नाही. 


या तीन गोष्टींचा संसर्ग होईल


डॉक्टर नीरज निश्चल म्हणाले, 'साथीचा रोग याचा अर्थ असा नाही की जोपर्यंत तुमचे डॉक्टर तुम्हाला अनेक प्रकारची औषधे किंवा नवीन प्रकारच्या गोळ्या देत नाहीत तोपर्यंत तुम्ही बरे होऊ शकत नाही. शेवटी, संयम, सकारात्मक विचार आणि पॅरासिटामॉल देखील बहुतेक रुग्णांना बरे करु शकते.


संक्रमितावर उपचार घरी शक्य  


ते पुढे म्हणाले, ' कोरोना महामारीच्‍या तिसर्‍या लाटेच्‍या काळात, आतापर्यंत बहुतांश संक्रमित लोकांमध्‍ये सौम्य संसर्ग दिसून आला आहे, ज्यावर विशेष उपचारांशिवाय घरी उपचार करणे शक्य आहे.'


केंद्र सरकारने सोमवारी सांगितले की, यावेळी समोर येणार्‍या बाधितांपैकी केवळ 5-10 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. मात्र, ही परिस्थिती झपाट्याने बदलू शकते, अशा परिस्थितीत पूर्ण काळजी घेण्याची गरज असल्याचा इशाराही सरकारने दिला.


नुकत्याच मंजूर झालेल्या मोलनुपिराविरबाबत (Molnupiravir) डॉ. नीरज निश्चल म्हणाले की, हे जादूचे औषध म्हणून प्रसिद्ध केले जात आहे, परंतु तसे नाही. लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की हे औषध केवळ मर्यादित आपत्कालीन वापरासाठी मंजूर आहे.