दिल्ली : देशात मंकीपॉक्सचा प्रसार वाढताना दिसतोय. राष्ट्रीय राजधानीत बुधवारी एका 31 वर्षीय नायजेरियन महिलेला मंकीपॉक्स संसर्गाची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर दिल्लीतील मंकीपॉक्स संक्रमितांची संख्या चार झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत मंकीपॉक्सची नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर आता देशात या संसर्गाची लागण झालेल्यांची संख्या 9 झाली आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे, ही देशातील पहिली महिला आहे जिला मंकीपॉक्सचा संसर्ग झाला आहे. मंकीपॉक्स संसर्गामुळे ताप आणि हातावर फोड येतात.


रुग्ण LNJP मध्ये दाखल


महिलेला ताप आणि हाताला फोड आलेले असून तिला लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. शिवाय या महिलेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून बुधवारी तिला संसर्ग झाल्याचं सांगितलंय.


सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज


इतकंच नव्हे तर या महिलेच्या परदेशी प्रवासाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. विशेष म्हणजे दिल्लीतील मंकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाला सोमवारी एलएनजेपी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.