Monkeypox cases rise globally: कोरोना महामारीशी संपूर्ण जग लढा देत असतानाच आता एका नव्या आजाराचं संकट वाढू लागलं आहे. जगभरातील 12 पेक्षा जास्त देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूची सुमारे 100 प्रकरणं समोर आली आहेत. सुदैवाने या आजाराने आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या देशांमध्ये ही प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मंकीपॉक्सच्या रुग्णांना विलिगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेणारा बेल्जियम हा पहिला देश ठरला आहे.


चेचक की तुलना में मंकीपॉक्स कितना घातक?
बेल्जियमच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतला. मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्यावर रुग्णाच्या शरीरावर पुरळ उठतं. यासोबतच ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी या लक्षणांचाही समावेश आहे. मंकीपॉक्स स्मॉलपॉक्सपेक्षा कमी प्राणघातक आहे. यात मृत्यू दर 4 टक्क्यांपेक्षा कमी आहे.


बेल्जियममध्ये मंकीपॉक्सचे चार रुग्ण
बेल्जियममध्ये आतापर्यंत मंकीपॉक्सच्या चार प्रकरणांची पुष्टी झाली आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरातील 12 देशांमध्ये मंकीपॉक्सची एकूण 92 प्रकरणं आहेत, ज्यामध्ये 28 संशयित प्रकरणांचा तपास सुरु आहे. यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, इंग्लंडमध्ये 7 मे रोजी नायजेरियातून प्रवास केलेल्या रुग्णामध्ये मंकीपॉक्सची लक्षण आढळली.


मंकीपॉक्सची लक्षणं
मंकीपॉक्स चिकनपॉक्सपेक्षा सौम्य आहे आणि त्याची लक्षणे ताप, डोकेदुखी, शरीरावर पुरळ आणि फ्लू सारखी आहेत. ही लक्षणे 3 आठवड्यांच्या आत स्वतःहून निघून जातात. याशिवाय, मंकीपॉक्स शरीरातील लिम्फ नोड्स किंवा ग्रंथी देखील वाढवते. बहुतेक लोकांना फक्त ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा जाणवतो. संसर्ग अधिक गंभीर असल्यास, चेहऱ्यावर आणि हातावर पुरळ आणि फोड येऊ शकतात, जे हळूहळू शरीराच्या इतर भागात पसरू शकतात. 


मंकीपॉक्स म्हणजे काय?
डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य आजार आहे. प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या विषाणूमुळे हा आजार होता. 'मंकीपॉक्स' हे नाव 1958 मध्ये डॅनिश प्रयोगशाळेत माकडांमधील विषाणूच्या सुरुवातीच्या शोधावरून आलं आहे. 1970 मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये एका मुलामध्ये प्रथम मानवी केस आढळली होती.