मुंबई : कोरोना व्हायरसच्या महामारीमध्ये जगात आणखी एक मोठ्या संसर्गाने डोकं वर काढलं आहे. मंकीपॉक्स असं या संसर्गाचं नाव आहे. जगातील अनेक देशांमध्ये या संसर्गाचे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे हा आजार कसा पसरतोय, याची चिंता तज्ज्ञांना सतावतेय. आता 'या' आजारावर डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केलाय जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र या प्राणघातक आजाराच्या प्रसारासाठी लैंगिक संबंध हे एक मोठं कारण असू शकतं. 


तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही 'मंकीपॉक्स' ग्रस्त व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवलात तर तुम्हाला या संसर्गाची लागण होण्याची शक्यता आहे.


मंकीपॉक्सची लक्षणं


  • स्नायूंमध्ये वेदना आणि थंडी वाजूणं

  • रुग्णाला खूप थकवा जाणवणं 

  • लिम्फ नोड्स सुजणं

  • तीव्र ताप आणि न्यूमोनियाची लक्षणं

  • शरीरावर गडद लाल ठिपके दिसणं

  • डोकेदुखी 


तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, 'मंकीपॉक्स' हा कांजिण्याप्रमाणे एक पॉक्स आहे. परंतु अजूनपर्यंत या संसर्गाच्या प्रसाराचं नेमकं कारण आणि उपचार सापडलेले नाहीत. 


जगभरातील रुग्णांची माहिती घेल्यानंतर, या संसर्गाची काही सामान्य लक्षणं आढळून आली आहेत. ज्यामध्ये मान, पाठ आणि डोके दुखणं, ताप, थरथर कापणं, थकवा आणि शरीरावर लहान खुणा यांचा समावेश आहे.