विचार केल्यापेक्षा अधिक वेगाने पसरतोय Monkeypox; नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
या संसर्गाचं वाढतं प्रमाण पाहता देशभरातील लोकांची चिंता वाढत आहे.
मुंबई : देशात मंकीपॉक्सचे एकूण 8 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या संसर्गाचं वाढतं प्रमाण पाहता देशभरातील लोकांची चिंता वाढत आहे. चिंतेचे एक कारण आहे की, अनेक रुग्णांचा परदेशी प्रवासा केल्याचा इतिहास नसतानाही त्यांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे.
मंकीपॉक्स हा विचारापेक्षा जास्त धोकादायक
अशा स्थितीत मंकीपॉक्सची प्रकरणं जेवढी वाटली होती त्यापेक्षा जास्त प्रमाणात पसरल्याचं बोललं जातंय. केरळमधून एकूण 5 प्रकरणं समोर आली आहेत आणि दिल्लीमध्ये 3. यापैकी केरळमधील पाचवा रुग्ण यूएईला गेला आहे, ज्याचे वय 35 वर्षे आहे. तसंच, मंकीपॉक्समुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची पुष्टी केरळ राज्य सरकारने सोमवारी केली.
दिल्लीतील तीन प्रकरणं चिंतेचा विषय
दिल्लीत मंकीपॉक्सचे तीन रुग्ण समोर आले, त्यापैकी एकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र दिल्लीत दाखल झालेल्या नवीन रुग्णांपैकी एकाही रुग्णाचा परदेश प्रवासाचा इतिहास नाही. यापैकी दोन लोक नायजेरियन वंशाचे असून ते दिल्लीत दीर्घकाळापासून राहतात. याशिवाय एका महिलेला दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिचे ज्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
काळजी घेणं आवश्यक
या महिलेचाही परदेश प्रवासाचा इतिहास नाही. याचा अर्थ लोकांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. कारण देशात अशी प्रकरणं आहेत की, मंकीपॉक्स नेमका कुठून आला हे शोधणं कठीण जातंय.
मंकीपॉक्स जीवघेणा आहे?
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मंकीपॉक्स जीवघेणा ठरू शकतो की काय अशी भीती लोकांमध्ये पसरलीये. पण रिपोर्ट्सनुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तीला व्हायरल एन्सेफलायटीस झाला होता. त्यामुळे त्या व्यक्तीमधील मल्टी ऑर्गन फेल झाले होते.