Monkeypox: कोणत्या वयोगटातील व्यक्तींना मंकीपॉक्सचा धोका? जाणून घ्या
मंकीपॉक्स हा कोरोनाव्हायरसइतका संसर्गजन्य नाही नसला तरी मुलांना जास्त धोका असतो.
मुंबई : आतापर्यंत जगातील 78 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 18 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आलेत. लहान मुले आणि वृद्धांना कोणत्याही आजाराचा धोका जास्त असतो. वृद्धांची प्रतिकारशक्ती तरुणांपेक्षा कमी असते, त्यामुळे जर ते संसर्गाला बळी पडले तर त्यांच्यासाठी धोका वाढतो. मंकीपॉक्स हा कोरोनाव्हायरसइतका संसर्गजन्य नाही नसला तरी मुलांना जास्त धोका असतो.
मंकीपॉक्सबद्दल, दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हा संसर्गजन्य रोग मुलांसाठी घातक ठरू शकतो. मंकीपॉक्स व्हायरस हा स्मॉल पॉक्स असला तरी, या आजारावर स्मॉल पॉक्सची लस दिसून येतेय. जागतिक आरोग्य संघटनेने देखील पुरुषांना मंकीपॉक्सचा संसर्ग टाळण्याचा सल्ला दिलाय.
कोणत्या वयातील लोकांना मंकीपॉक्सचा धोका?
मंकीपॉक्स बद्दल सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की, सर्वात जास्त धोका कोणाला असू शकतो? तज्ज्ञांच्या मते, मंकीपॉक्स हा कांजिण्यासारखाच एक आजार आहे, जो कोरोना सारखा पसरत आहे. ज्या लोकांना कांजिण्याविरूद्ध लसीकरण करण्यात आले आहे त्यांना मंकीपॉक्सचा धोका कमी असल्याचं म्हटलं जातंय.
1980 पूर्वी जन्मलेल्या लोकांना चिकन पॉक्स किंवा स्मॉल पॉक्स विरूद्ध लसीकरण करण्यात आलंय. त्यानंतर जन्मलेल्या लोकांना मंकीपॉक्सचा धोका असू शकतो. म्हणजेच 42 वर्षांखालील लोकांना मंकीपॉक्सचा मोठा धोका असतो. तसंच, मुलांना सर्वात जास्त धोका असतो.