मुंबई : व्यायाम करण्यापूर्वी तसंच नंतर खाण्याबाबत खूप काळजी घेण्याची गरज आहे. रिकाम्या पोटी व्यायाम करणं किंवा व्यायामानंतर काहीही न खाणं यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. इतकंच नाही तर व्यायामापूर्वी किंवा नंतर लगेच जास्त खाल्ल्यानंतर काहींना उलट्या, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यायामापूर्वी किंवा नंतर योग्य आहार न घेतल्यास शरीरात साठवलेल्या ग्लायकोजेनचा ऊर्जेसाठी वापर होतो. त्यामुळे परिस्थितीत, व्यायामानंतरच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. जाणून घेऊया एक्सरसाइज केल्यानंतर काय खाल्लं पाहिजे.


ड्राय फ्रुट्स


एका अभ्यासानुसार, ड्राय फ्रुट्स हे आरोग्यासाठी उत्तम बूस्टर आहेत. इतकंच नाही तर ते प्रोटीन, आहारातील फायबर, जीवनसत्त्वं आणि खनिजं यांचा चांगला स्रोत आहेत. तुम्ही तुमच्या स्मूदी बाऊलमध्ये काही बदाम, शेंगदाणे, पिस्ता घालू शकता किंवा व्यायामानंतर मूठभर काजू खाऊ शकता.


ओट्स


वर्कआउटनंतर तुम्ही ओट्स खाण्याचा पर्याय निवडू शकता. ओट्समध्ये असलेले पबमेड सेंट्रल 2 मध्ये पब्लिश झालेल्या  अभ्यासानुसार, ओट्स, जे व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सने समृद्ध आहेत, ते तुमची भूक कमी करण्यासाठी आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.


रताळं


रताळं हे व्यायामानंतर खाण्याचा उत्तम पर्याय आहे. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असतं आणि याच्या सेवनामुळे तुम्हाला भूकही लागत नाही. एका अभ्यासानुसार, जर तुम्ही वजन कमी करत असाल तर उत्तम मार्ग म्हणजे उकडलेलं रताळं खाणं.