मुंबई : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की आजारपण सुरू होतात. साचलेल्या डबक्यामुळे डासांची पैदास होते. प्रामुख्याने डास चावले की डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा आजारांची साथ येते, पण डास चावल्याने लिम्फेटिक फाइलेरिया हा देखील एक गंभीर आजार जडण्याची शक्यता असते हे तुम्हांला ठाऊक आहे का? 


काय आहे लिम्फेटिक फाइलेरिया? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डास चावल्यानंतर डासाद्वारा मानवी शरीरात रक्तापेक्षा पातळ धाग्यासारखे कीटाणू तरंगू लागतात. परजीवीप्रमाणे हे कीटाणू वर्षानुवर्ष शरीरात राहतात. 


फाइलेरिया या आजाराला हत्तीरोगही म्हणतात. या आजारामध्ये अंगावर आणि प्रामुख्याने पायावर, घोट्याच्या खालच्या बाजूला सूज वाढते. यामुळे पायाचे स्वरूप बिघडते, अपंगत्व जडण्याची शक्यता असते.  या '5' कारणांंमुळे विशिष्ट लोकांंनाच डास अधिक प्रमाणात चावतात !


देश लिम्फेटिक फाइलेरियाच्या विळख्यात 


2016 सालच्या एका रिपोर्टनुसार, देशातील 256 जिल्ह्यातील  99 टक्के गावातून या आजाराचा समूळ नाश झाला आहे. मात्र देशाला फाइलेरिया मुक्त करण्यासाठी अजूनही काही काळ लागल्याची शक्यता आहे. त्यावर्षी 87 लाख लोकांना हा आजार जडला. तर 2.94 कोटी लोकांना फाइलेरियामुळे अपंगत्व आले.   2020 पर्यंत भारताला लिम्फेटिक फाइलेरियापासून मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. डासांना पळवून लावतील हे घरगुती उपाय!