मुंबई : 'निपाह' व्हायरसमुळे केरळ राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. एकाच परिवारातील काही सदस्यांनी जीव गमावले आहेत. एकूण 13 जण 'निपाह' व्हायरसच्या संपर्कात आल्याने दगावले आहेत. त्यानंतर सरकारने देशभरात हाय अलर्ट जारी केला आहे.   'या' गावात पहिल्यांदा आढळला जीवघेणा 'nipah virus'


 आरोग्य विभागाचा रिपोर्ट   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आरोग्य विभागाने केरळमधील निपाह पसरण्यामागे वटवाघुळ नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 'निपाह' पसरण्यामागील नेमका स्त्रोत कोणता? याबाबत अधिक तपास सुरू आहे. केवळ 'निपाह' व्हायरस नव्हे तर जगात इतरही जीवघेणे व्हायरस धोकादायक बनले आहेत. ज्यांचा संसर्ग झाल्याने अवघ्या काही तासात जीव गमावण्याची शक्यता असते.  'निपाह'चा प्रसार वटवाघुळांंमुळे नव्हे - लॅब टेस्टच्या खुलाशाने गूढ वाढलयं !


 कोणते आहेत व्हायरस?   


1. मारबुर्ग हा अतिशय धोकादायक व्हायरस आहे. या व्हायारसचा संसर्ग झाल्यास रक्तास्त्रावी ताप जडण्याची शक्यता असते. इबोला प्रमाणेच या व्हायरसचा संसर्ग झाल्यास मांसपेशींमध्ये वेदना, अचानक शरीरात रक्तस्त्राव होण्याची शक्यता बळावते. 'मारबुर्ग'ची लागण झाल्यानंतर सुमारे 90% रूग्णांचा मृत्यू होतो.  


2. आफ्रिकन देशांमध्ये 'इबोला' झपाट्याने वाढत आहे. केवळ फ्लाईंग फॉक्स या वटवाघुळांच्या प्रसाराद्वारा नव्हे तर इतर प्राण्यांच्या मांसातून आणि रक्तातूनही  व्हायरसचा प्रसार होतो. इबोला जडल्यानंतरही 90% रूग्णांनी त्यांचे प्राण गमावले आहेत.  ... म्हणून जीवघेणा 'इबोला' कधीच नष्ट होणार नाही


3.हंटा व्हायरसदेखील धोकादायक आहे. 1950 साली कोरियन युद्धादरम्यान या अमेरिकन सैनिकांना या व्हायरसचा धोका बळावला होता. या व्हायरसच्या संपर्कात आल्याने फुफ्फुसांचे आजार, ताप, किडनी विकार जडण्याची शक्यता असते. 


4. लस्सा व्हायारसचा संसर्ग होणारी नायजेरियन महिला नर्स पहिली होती. उंदरांमुळे हा व्हायरस पसरतो. पश्चिम आफ्रिकेमध्ये या व्हायरसचा धोका अधिक आहे.  


5.बर्ड फ्लूमध्येही अनेक प्रकार आहेत. यापैकी H5N1 व्हायरसच्या विळख्यात सापडणं अधिक धोकादायक आहे. आशियामध्ये या व्हायरसचा धोका अधिक आहे. तर पोल्ट्रीत  थेट संपर्कात आल्याने  या व्हायरसची लागण होऊ शकते. सतत कोंबड्यांशी संपर्क असलेल्या व्यक्तींना हा धोका अधिक असतो.48 तासात जीवघेणा ठरतोय 'निपाह' व्हायरस