मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होतेय. दरम्यान मुंबईत कोरोनाची परिस्थिती पाहून जंबो कोविड सेंटर्स ऍक्टिव्ह केले जातायत. दुसरीकडे एकट्या मुंबईमध्ये 99 टक्के कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे असल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत तब्बल 99 टक्के रूग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. 202 नमुन्यांपैकी 201 नमुने ओमायक्रॉनचे असल्याची माहिती आहे. तर यामध्ये एक रूग्ण डेल्टा व्हेरिएंटचा आढळला आहे. 


12 व्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालातून ही आकडेवारी उघड झाली आहे. 12 व्या जिनोम चाचणीत 279 रूग्णांचे नमुने तपासण्यात आले होते. यामधून मिळालेल्या अहवालानुसार, यामध्ये तरूणांना सर्वाधिक लागण झाली. 202 पैकी 44 टक्के रूग्ण हे केवळ 21 ते 40 वयोगटातले आहेत.


जंबो सेंटर्स केले एक्टिव्ह


कोविडच्या तिसऱ्या लाटेत मुंबईत जंबो सेंटर्स सुरु आली होती. त्यामुळे आता अशा स्थितीत मुंबईत ज्या वेगाने कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होतेय त्यानंतर मुंबईत उभारलेल्या या जम्बो सेंटर्सना एक्टिव्ह करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.


महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 956 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना रुग्णांचा जून महिन्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. तर मुंबईत 1 हजार 724 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.