मुंबई : पावसाळा सुरू झाला की निसर्गामध्ये एक नवं चैतन्य निर्माण होतं. वातावरणातील हलका गारवा सुखकारक असला तरीही साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने काळजी घेणं आवश्यक आहे. प्रामुख्याने लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांनी या काळात काळजी घेणं आवश्यक आहे. 
गरोदर स्त्रीयांसाठी नाजूक असलेल्या या काळामध्ये इंफेक्शन झाल्यास आईसोबतच गर्भावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी या दिवसांमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.  सिझेरियन प्रसुतीबाबतची 8 धक्कादायक सत्य ! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूषित पाणी, उघड्यावरचे अन्न,डास यांच्यामुळे पावसात अनेक साथीचे आजार पसरतात. यामध्ये डेंग्यू, मलेरिया, लेप्टोपासून अगदी हेपिटायटीसचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे या इंफेक्शनपासून बचावण्यासाठी काही एक्सपर्ट टीप्स लक्षात ठेवणं गरजेचे आहे. 


गरोदर स्त्रियांनी कशी घ्यावी काळजी ? 


हात  स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. नियमित हात स्वच्छ केल्याने  इंफेक्शनचा धोका कमी होतो. WHO च्या अहवालानुसार, सुमारे 40-60 सेकंद हात स्वच्छ धुणं आवश्यक आहे. नकळत आपला अनेक ठिकाणी स्पर्श होत असतो. त्यामुळे बॅक्टेरियाचे इंफेक्शन वाढते. 


गरोदरपणाच्या काळात खाण्या-पिण्यावर बंधनं येतात. अशावेळेस खाण्याची इच्छा नसते. त्यावेळेस नेहमीचं जेवण जेवण्याऐवजी अनेकजण फळांच्या सेवनावर अधिक भर देतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरून फळं विकत घेताना काळजी घ्या. खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्यावीत. 


कच्च्या भाज्यांचे सलाड आहारात घेताना काळजी घ्या. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी प्रयत्न करा. गरोदरपणात 'या' पदार्थामुळे वाढतो मधुमेहाचा धोका


साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा. पावसात भिजून घरी पोहचल्यानंतर पाय नीट स्वच्छ करा. पायांतील बोटांमधील भागही स्वच्छ करा.