मुंबई :  कधी पार्टीमध्ये मज्जा मस्तीमध्ये ड्रिंक्स थोडे जास्त होते. अशावेळी कपभर कॉफी प्यायल्याने आणि आराम केल्याने हॅंगओव्हरचा त्रास कमी होईल असे तुम्हांला वाटत असेल. पण असे गैरसमज वेळीच दूर करा. त्यासाठी न्युट्रीशनिस्ट उर्वशी स्वाहनी यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.


कॉफीने हॅंगओव्हर कमी होतो -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मद्यपानानंतर हॅंगओव्हर कमी करण्यासाठी कॉफी फायदेशीर ठरत नाही. कॉफीमुळे हा त्रास अधिक वाढतो. मळमळीचा त्रास वाढतो. कॉफी अ‍ॅसिडीक असल्याने यामुळे उलटी होऊ शकते.



क्लिअर अल्कोहने हॅगओव्हरचा त्रास नाही -


व्होडका सारखे क्लिअर अल्कोहल हॅंगओव्हरचा त्रास देत नाही. वाईन, व्हिस्कीप्रमाणेच व्होडका प्यायल्यानेदेखील हॅगओव्हरचा त्रास होतो.



नाश्त्याला अंडी खाणं -


सकाळी उठल्यावर ब्रेकफास्टला अंड्यांचा समावेश करण्यापेक्षा हलका नाश्ता करा. अशावेळी ब्रेड किंवा क्रॅकर्स खावेत. सामान्य दिवसांमध्ये यकृतामध्ये ग्लुकोज अधिक तयार होते आणि कार्ब्स साठवले जातात. मात्र मद्यपानानंतर ब्लड शुगर तयार होण्याचे काम मंदावते आणि शरीरात उर्जा कमी होते.


झोप -


आराम केल्याने हॅगओव्हर कमी व्हायला मदत होत नाही. कारण अल्कोहल मूत्रमार्गातून आणि श्वासातून शरीराबाहेर पडते. त्यामुळे बेडवर लोळत बसण्यापेक्षा सकाळी उठून जॉगिंग करा. एखादी दमछाक करणारी अ‍ॅक्टिव्हिटी करा 


व्हिस्कीने सुरवात आणि बिअरने शेवट करा -


अनेकांना असे वाटते की, वाईन किंवा व्हिस्कीने सुरवात केल्यानंतर बिअर प्यायल्यास यामुळे नशा येत नाही. तुम्ही कोणत्या क्रमाने ड्रिंक घेता यापेक्षा किती प्रमाणात घेता यावर हॅगओव्हर अवलंबून असतो.