मुंबई : नख जेवढं बोटांचं सौंदर्य वाढवतात तेवढीच ती आरोग्यासाठीही महत्त्वाची असतात. नखं स्वच्छ ठेवणं ती वेळच्या वेळी कापणं गरजेचं असतं. नाहीतर त्यापासून आपल्यालाच नुकसान होऊ शकतं. नखं कापताना बरेच जण छोट्या छोट्या चुका करतात त्यामुळे त्रास होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नख कापताना या चुका टाळल्या तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसू शकतो. नखं कापताना या टिप्स पाळल्या तर फायदा होईल. नख कापताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी जाणून घेऊया. 


ड्रयनेसमुळे नख कापताना योग्य शेपमध्ये ती कापणं कठीण असतं. त्यामुळे तुमची नखं जर ड्राय झाली असतील तर कापू नका. तुमची नखं जर खूप जास्त ड्राय होत असतील तर कोमट पाण्यात बोटं बुडवून ठेवा. त्यानंतर नखं कापा. 


नखांचं ट्रिमिंग करा
काही लोक नेलकटरने सरळ नखं कापून टाकतात. त्यामुळे ती नीट कापली जात नाहीत. नखं कापून झाल्यानंतर त्यांना ट्रिम करा. त्यांना योग्य आकार द्या. ती नीट घासा. नाहीतर ती नखं लागतात. त्यामुळे इजा होण्याची भीती असते. 


नखं सतत शेप करत राहिल्याने ती कमजोर होतात. त्यामुळे शार्प लूक देण्यापासून सावध राहा. नख आहेत त्या शेपमध्ये कापा. त्यांना धारधार किंवा टोकदार करण्याच्या भानगडीत पडू नका. नेहमी गोल आकारत नखं कापणं फायदेशीर मानलं जातं. 


काही लोक नखं कापताना नखांच्या आजूबाजूचा भागही कापतात. त्याला क्यूटिकल्स असं म्हणतात. हे कापल्यास तिथे इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो. त्यामुळे तो भाग कापू नका. तिथे इजा होऊ शकते. तो भाग नाजूक असतो. 


प्रत्येकाकडे स्वत:च नेलकटर असायला हवं. कधीच आपलं नेलकटर शेअर करू नका. त्यामुळे बॅक्टेरियाचा त्रास होऊ शकतो. स्कीनच्या समस्या निर्माण होऊ शकतात. कधीच एकमेकांचं नेलकटर वापरू नका.