Doctor`s Day : कोरोनाविरूद्धच्या लढ्याची गोष्ट...ऐका नायर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्याकडून
आज डॉक्टर्स डे च्या निमित्ताने मुंबईतील नायर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्याशी संवाद साधलाय.
मुंबई : आज 1 जुलै...म्हणजेच जागतिक डॉक्टर दिन...सध्या कोरोनाच्या संकटकाळात स्वतःच्या जीवाचीही परवा न करता देशभरातील डॉक्टरांनी रूग्णांची अविरतपणे सेवा केली आहे. अहोरात्र झटणाऱ्या या डॉक्टरांना झी 24 तासचा सलाम करतं. तर आज डॉक्टर्स डे च्या निमित्ताने मुंबईतील नायर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्याशी संवाद साधलाय.
झी 24 तासशी बोलताना डॉ. भारमल यांनी, कोरोनाच्या काळात गेल्या दीड वर्षापासून अगदी 24 तास काम करत डॉक्टर कसा देव आहे हे लोकांना पटवून दिलं असल्याचं सांगितलंय. त्याचप्रमाणे डॉक्टरांवर होणारे हल्ले दुर्देवी आणि चुकीचे असल्याचं त्यांनी म्हटलंय. डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबवावे असं आवाहनंही डॉ. भारमल यांनी समाजाला केलंय.