National Smile Day 2023 : निरोगी राहण्यासाठी जशी हवा, अन्न गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुमचे हसणे (National Smile Day) देखील तुम्हाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुम्हाला सकाळ संध्याकाळ हसण्याची चांगली सवय असेल तर कोणताही आजार तुम्हाला त्रास देणार नाही. अशा परिस्थितीत हसणे तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.


तणाव दूर होतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हसण्याने तुमच्या शरीरातील थकवा दूर होतो आणि तणाव कमी होतो. विशेष म्हणजे हसण्याचे काहीही कारण नसले आणि तरीही आपण हसलो, तर तणावाची पातळी कमी होते.यामुळे तुमचा मूडही सुधारेल. हसण्यामुळे न्यूरोपेप्टाइड्स बाहेर पडतात, ज्यामुळे व्यक्तीचा मूड सुधारतो.


रक्तदाब नियंत्रित


जगभरात लाखो लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. रक्तदाब वाढल्याने हृदयविकारासह अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो. तुम्ही जर दररोज हसलात तर तुमचे ब्लड प्रेशक कमी होईल. त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांनी दररोज हसले पाहिजे.


रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते


 ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते ते लवकर आजारी पडतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, ती मजबूत करण्यासाठी लोक औषधांचा आधार घेतात. मात्र ते हसत राहिले तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. त्यामुळे ऋतूमानानुसार होणारे आजारा, ताप, सर्दी, खोकल यांपासून बचाव करता येणे शक्य होते. 


वेदनांपासून मुक्ती 


तुमच्या शरीरात वेदना होत असतील तर तुम्ही हसून ते कमी करू शकता. हसण्यामुळे आपल्या शरीरातून एंडोर्फिन आणि सेरोटोनिन हार्मोन्स रिलीज होतात,  जे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करतात. यामुळे शरीराला आराम मिळतो आणि मूडही सुधारतो. हसण्यामुळे तुमची वेदना कायमची दूर होऊ शकते.


तुमचे लूक सुधारेल


तुमच्या हसण्यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आनंदी राहता, ज्यामुळे तुमचे सौंदर्य वाढते. जर तुम्ही रोज हसत असाल तर काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल, तुमचा चेहरा आकर्षक दिसू लागेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. यामुळे तुम्हाला लवकरच यश मिळू शकते. 


रात्री सहज झोप येत नसेल तर 


जर तुम्हाला रात्री सहज झोप येत नसेल तर हसण्याची सवय लावा. हसण्याच्या शरीरात मेलाटोनिनसारखे हार्मोन्स तयार होतात. जे तुम्हाला शांत झोपायला मदत करते.


स्पॉन्डिलायटिस किंवा पाठदुखीचा त्रास


जर तुम्हाला स्पॉन्डिलायटिस किंवा पाठदुखीचा त्रास होत असेल तर फक्त मोकळेपणाने हसल्याने या दुखण्यापासून मुक्ती मिळते. तुम्ही 10 मिनिटे हसत राहिल्यास, तुम्हाला काही तासांच्या वेदनांपासून आराम मिळू शकतो. 


दीर्घ श्वास घेण्यास मदत होते


तुम्ही हसता तेव्हा तुमच्या फुफ्फुसातील हवा वेगाने बाहेर येते. हे तुम्हाला दीर्घ श्वास घेण्यास मदत करेल. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो. तसेच हसल्याने ऊर्जा मिळते. हसण्यामुळे आपल्या शरीरातील थकवा आणि आळस निघून जातो.


 


 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)