मुंंबई : मूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या तोंडाशी असलेल्या रक्त वाहिन्यांना सूज येऊन रक्त साठून राहणे. यामुळे शौचाच्या वेळेस वेदना होणे, रक्त पडणे अशा समस्या उद्भवू शकतात. नियमित भरपुर पाणी व मुबलक प्रमाणात फायबरयुक्त भाज्या व फळं खाल्ल्यास मूळव्याध आटोक्यात येऊ शकतो.  मूळव्याधीचा त्रास वेदनादायी आणि त्रासदायक असल्याने अनेकजण हा त्रास लपवून ठेवतात. यामुळे मूळव्याधीची समस्या अधिक तीव्र बनत जाते. परिणामी अनेकांना शस्त्रक्रियेची मदत घ्यावी लागते. मात्र वेळीच मूळव्याधीची लक्षण ओळखल्यास हा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. पहा मूळव्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी कोणते नैसर्गिक उपचार फायदेशीर ठरतात.  


जिरं -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिरं भाजून त्याची पूड करावी. ही पूड गरम पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्यास रात्री झोप झोपण्यापुर्वी घेतल्यास 3 ते 4 दिवसांत तुम्हाला आराम मिळेल. जिरं हे फायबर युक्त असून पोटातील वायू कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे मळ सैल होतो व शौचास साफ होते.जिरं - मूळव्याधीच्या समस्येवरील घरगुती उपाय


गुलाब -


मुळव्याधीवर गुलाब देखील उपयुक्त आहे. आश्चर्य वाटले ना? हो. 10-12 गावठी गुलाबाच्या ( सुरक्षित पद्धतीने वाढवलेल्या) पाकळ्या कुटून 50मिली पाण्यात टाकून सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास नक्किच आराम मिळतो.गरोदर स्त्रियांमधील 'हा' त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी गुलकंद फायदेशीर


दुर्वा -


स्त्रियांमध्ये मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी दुर्वा फार उपयुक्त आहेत . २ चमचे दुर्वा कुटून त्या कपभर गायीच्या दुधात उकळून घ्या. हे मिश्रण गाळून रोज घेतल्यास मुळव्याधीपासून आराम मिळेल.


कांदा -


मुळव्याधीच्या त्रासात जर रक्त पडत असेल तर कांद्याचा रस जरूर घ्या. यासाठी 30 ग्राम कांद्याचा रस व 60 ग्राम साखर एकत्र करून ते मिश्रण काही दिवसांसाठी दिवसातून दोनदा घ्या.


डाळींब -


डाळींबाच्या साली टाकाऊ नसतात . मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी डाळिंबाच्या सालीदेखील तितक्याच उपयुक्त आहेत.अर्धाकप उन्हात सुकवलेल्या डाळींबाच्या साली 30मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.त्यात 1 चमचा जिरं , 3/4 कप ताक व मीठ घालून मिश्रण एकत्र करा. मुळव्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी हे मिश्रण आठवड्यातून तीन वेळेस घ्यावा.मूळव्याधीचा त्रास दूर करण्यासाठी केळं फायदेशीर


मूळा -


मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी तसेच पोट साफ़ होण्यासाठी मुळा फार उपयुक्त आहे. 60 ग्राम मुळ्याच्या ताज्या रसात मीठ घालून ते मिश्रण आठवड्यातून दोनदा सलग 40 दिवस घेतल्यास तुम्हाला आराम मिळेल.


तीळ -


तीळ कुटून त्याची पेस्ट मोडांवर लावल्यास , आराम मिळतो. तसेच अर्धा चमचाभर तिळ बटरमध्ये एकत्र करून खाल्ल्यानेदेखील आराम मिळतो.


बर्फ -


वेदना , सूज कमी करण्यासाठी बर्फाचा शेक फार हितकारी आहे. मूळव्याधीच्या त्रासात गुदद्वारापाशी वेदना होत असल्यास पाठीवर झोपून बर्फाचा जास्तीत जास्त १० मिनिटांसाठी शेक द्यावा.