मुंबई : गरोदरपणाचा काळ संपल्यानंतर पोटावर स्ट्रेचमार्क येतात. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर काही दिवसातच जेव्हा तुमचं पुन्हा रूटिन सुरू होतं तेव्हा स्ट्रेचमार्कमुळे काही कपडे घालण्यावर बंधनं येतात. क्रॉप टॉप, लो वेस्ट जीन्स घालताना स्ट्रेचमार्क दिसू नयेत म्हणून प्रयत्न सुरू होतात. अशावेळेस स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरणार आहेत. सिझेरियन प्रसुतीबाबतची 8 धक्कादायक सत्य !  


 अंड्यांचा पांढरा बल्क - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 स्ट्रेच मार्क्सच्या भागाला नीट स्वच्छ करा. त्यावर अंड्याचा पांढरा भाग लावा. हे सुकल्यानंतर पुन्हा थंड पाण्याने पोटाजवळचा भाग स्वच्छ करा. त्यानंतर ऑलिव्ह ऑईलचा मसाज करा. 


 बटाटा -  


 बटाट्याचा रस काढा. हा रस स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर लावा. तीन आठवडे हा उपाय नियमित करा. हळूहळू स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी होईल.  


 कोरफड  -


 स्ट्रेचमार्क्सवर कोरफडीचा गर  नियमित लावा. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने सारा भाग स्वच्छ करा. सलग काही आठवडे हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास दूर होईल.   


 तेलाचा मसाज -


 तेलाचा मसाज  नियमित केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी होईल. याकरिता नारळ, बदाम, ऑलिव्ह ऑईलचा मसाज करणं फायदेशीर ठरत.  


कॉफी आणि कोरफड पॅक -


कॉफी आणि कोरफडीचा गर एकत्र मिसळा. हा पॅक स्ट्रेच मार्कवर लावा. 15-20 मिनिटांनी हा पॅक पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर मॉईश्चरायझर क्रिम लावा. महिनाभार हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क्सच्या त्रासातून तुमची सुटका होऊ शकते.वजन कमी करताना येणारे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी '५' एक्स्पर्ट टिप्स