मुंबई : काही विशिष्ट वयापर्यंतच उंची वाढते. त्यामुळे साधारण वयाच्या 18 वर्षापर्यंत मुलांच्या उंचीकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. या वयाच्या टप्प्यावर मुलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. यामुळे मुलांच्या शरीराच्या वाढीकडे नीट लक्ष देणं गरजेचे ठरते. 


मुलांची उंची वाढण्यासाठी काय कराल ? 


कॅल्शियम घटक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांची उंची वाढवायची असेल तर त्यांच्या आहारत कॅल्शियम घटकांचा मुबलक प्रमाणात समावेश करणं आवश्यक आहे. कॅल्शियममुळे हाडांचा विकास होतो. याकरिता आहारात दूध आणि दूग्धजन्य पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.  


 व्यायाम   


 व्यायाम आणि प्रामुख्याने योगाभ्यास केल्यानेही वजन आणि उंची दोन्ही वाढवणं शक्य आहे. लटकण्याचा व्यायाम करणं आरोग्याला फायदेशीर ठरतं. सोबतच भुजंगासन केल्यानेही उंची वाढण्यास मदत होते.  


 वाकून बसणं, चालणं टाळा  


 वाकून बसणं किंवा चालणंदेखील टाळा. यामुळे शरीराचा बांधा झुकलेला दिसतो. चालताना, बसल्यावर झुकून बसणं, चालणं टाळा. ताठ राहिल्यानं व्यक्तिमत्त्वही उठावदार दिसतं सोबतच शरीराची उंची उत्तम दिसते.  


योग्य प्रमाणात खाणं  


उंची वाढण्यासाठी शरीरात ग्रोथ हार्मोन्सची वाढ होणंही गरजेचे आहे. याकरिता नियमित आणि थोड्या थोड्या वेळानं खाणं गरजेचे आहे. दिवसातून किमान 5-6 वेळेस खाणं आवश्यक आहे. 


अश्वगंधा 


तुम्हांला उंची वाढवायची असेल तर आहारात अश्वगंधाचे सेवन करणं आवश्यक आहे. अश्वगंधामध्ये अनेक मिनरल्स घटक असतात, त्याच्या नियमित सेवनाने उंची वाढायला मदत होईल. 


संतुलित आहार 


नियमित संतुलित आहाराच्या सेवनामुळे उंची वाढण्यास मदत होते. त्यामुळे  कितीही जंकफूड खाण्याचा मोह होत असला तरीही त्यावर आवर घाला आणि आहारात नियमित संतुलित जेवणाचा समावेश करा. 


व्हिटॅमिन डी 


उंची वाढवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे. कोवळ्या सूर्यप्रकाशातून शरीराला नैसर्गिक स्वरूपात व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो. सकाळ - संध्याकाळ किमान 20-30 मिनिटं कोवळ्या उन्हात फिरा. 


 आवळा 


 उंची वाढवण्यासाठी आवळ्याचं नियमित सेवन करणं आरोग्यदायी ठरते. आवळ्यातील व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे शरीराचा विकास होण्यास, उंची वाढण्यास मदत होते.