Navratri 2023 : 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना असून नवरात्रीचे नऊ दिवस सुरू होत आहेत. महिलांसाठी हा अतिशय उत्साहाचा सण. नऊ दिवसांच्या या उत्सवात देवीची मनोभावे पूजा केली जाते. नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे परिधान करून गरबा खेळला जातो. नऊ दुर्गेची मनोभावे पूजा केली जाते. अनेक मुली या नऊ दिवसांत कडक उपवास करतात. पण जर याच नऊ दिवसांत तुमची मासिक पाळी असेल तर मुलींचा उत्साह अगदी मावळतो. कळत नकळत या दिवसांमुळे महिलांच्या उत्साहावर नाराजीचे सावट असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशावेळी अनेक महिला किंवा मुली गोळ्या घेऊन पीरिएड्स पुढे ढकलतात. पण या सगळ्याचा हार्मोन्सवर विपरित परिणाम होतो. मासिक पाळी पुढे ढकलण्याची नैसर्गिक पद्धत. (फोटो सौजन्य - iStock)


लिंबाचा रस 


मासिक पाळीची तारीख पुढे करण्यासाठी लिंबू पाणी सेवन करणे खूप फायदेशीर आहे. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड मासिक पाळीच्या तारखा वाढवण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते. मासिक पाळी दरम्यान रक्त प्रवाह कमी करण्यासाठी देखील याचे सेवन करणे फायदेशीर आहे. 


मोहरीचे सेवन 


मासिक पाळीख पुढे करण्यासाठी मोहरीचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. तुम्हालाही पीरियड्सची तारीख काही दिवस वाढवायची असेल, तर मोहरीची पावडर बनवून ती कोमट दुधासोबत आठवड्यातून एकदा प्या, असे केल्याने मासिक पाळी वाढण्यास मदत होते.


तांदळाचे पाणी 


मासिक पाळीची तारीख वाढवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिणे फायदेशीर ठरते. लिंबू आणि तांदळाच्या पाण्यात असलेले गुणधर्म मासिक पाळीच्या तारखा वाढवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यासाठी तांदळाच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करा.


मुल्तानी माती 


पीरिएड्स पुढे ढकलण्यासाठी मुल्तानी माती लावणे शरीरासाठी फायदेशीर आहे. पाळी पुढे ढकलण्यासाठी 20 ते 30 ग्रॅम मुल्तानी माती कोमट पाण्यात मिसळून प्या. 


चण्याची डाळ 


चण्याची डाळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या डाळीच्या सेवनाने शरीरातील अनेक समस्या दूर होतात. जसे की, पाळीच्या दिवसांमध्ये फ्लो देखील कमी होतो. होणारा कोणताही त्रास बरा होतो.