मुंबई : तुमचं आरोग्य चांगले ठेवायचं असेल तर झोपेची पूर्तता करण्याची गरज आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की झोपेतून उठल्यानंतरही अनेक समस्या उद्भवू शकतात. पण सध्या कामाचा ताण आणि धकाधकीच्या जीवनात लोकं पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. अशावेळी झोपेतून उठल्यानंतर लगेच कामाला सुरुवात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोपेतून उठल्यानंतर तातडीने कामाला लागू नये. तुम्हीही असं करत असाल तर सावधान. यामुळे आरोग्याचं गंभीर नुकसान होऊ शकतं.


बहुतेक लोकांची सवय असते की, डोळे उघडताच अचानक जाग येऊन उठतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, डोळे उघडताच झोपेतून उठून बसल्याने त्याचा हृदयावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे डोळे उघडल्यानंतर कधीही 3-4 मिनिटांनी उठून बसावं.


जेव्हा एखादी व्यक्ती झोपलेली असते तेव्हा त्याच्या हृदयाला कमी रक्ताची गरज असते आणि त्यावेळी रक्तवाहिन्यांमध्ये कमी रक्त वाहत असतं. अशावेळी त्या नसांना सक्रिय व्हायला थोडा वेळ लागतो.  त्यामुळे ऑक्सिजनला योग्य प्रमाणात रक्त न मिळाल्यास व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.


त्यामुळे किमान सकाळी उठल्याबरोबर चार-पाच मिनिटे अंथरुणावर पडून राहा. झोपेतून उठल्याबरोबर चक्कर येण्याची समस्या येऊ शकते, रक्तदाबाचा त्रास, अशक्तपणा तसंच स्ट्रोकचा त्रासही वाढू शकतो.


सकाळी उठल्यावर काय करू नये


सकाळी उठल्याबरोबर कधीही धूम्रपान करू नका, कारण यामुळे कॅन्सरचा धोका खूप वाढतो. त्याच वेळी, झोपेतून उठल्याबरोबर कधीही रागराग करू नये. रात्रीच्या जेवणात तेल-मसालेयुक्त पदार्थांचे सेवन करणं टाळावं आणि कॉफीचं जास्त सेवन करू नये.