मुंबई : आपण गावाकडे गेलो की आवर्जून जांभूळ खातो. इतकंच नाही तर अनेक लोक आवडीने देखील हे फळ बाजारातून विकत घेऊन खातात. हे चवीला देखील चांगले असतात. इतकंच नाही तर जांभळाचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.  मधुमेहापासून ते अनेक आजारांवर जांभळाच्या बिया देखील लाभदायक आहे. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधिवात आणि इतर अनेक पचन समस्या बरे करण्यासाठी जांभूळ खूप फायदेशीर आहे. परंतु आपल्याला हे माहित असायला हवे की, प्रत्येक वस्तुच्या दोन बाजू असतात. त्यामुळे जांभळाचं सेवन आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. परंतु त्याला खाताना आपण काही गोष्टींची काळजी घेतली नाही, तर आपल्याला ते नुकसानकारक देखील ठरु शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला जाणून घेऊया जांभुळ खाताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.


1. जांभुळ खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका


जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे कारण जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे हे अनेक समस्यांवर मेजवानीसारखे आहे. त्यामुळे डायरियासारखा आजार तुम्हाला घेरतो. येथे जांभुळ खाल्ल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनंतरच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.


2. रिकाम्या पोटी कधीही जांभुळ खाऊ नये


रिकाम्या पोटी जांभुळ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि यामुळे तुमच्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात. जांभुळची चव आंबट असते, त्यामुळे रिकाम्या पोटी जांभुळ खाल्ल्याने अॅसिडीटी, पोटदुखी, पोटात जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पोटात काहीतरी गेल्यानंतरच जांभुळ खा.


3. दूध आणि जांभुळ एकत्र नक्कोच


दूध आणि जांभुळ एकत्र सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. हे फळ खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्याने गॅस, पोटदुखी यांसारख्या पचनाच्या समस्या होऊ शकतात. जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून दूर रहा आणि किमान 30 मिनिटांनंतरच दूध प्या.


4. हळद आणि जांभुळ कधीही खाऊ नका


जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच हळदयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. जर तुम्हाला जांभुळ खाल्ल्यानंतर हळद खाण्याची इच्छा असेल तर किमान 30 मिनिटे थांबा. वास्तविक, जांभुळ आणि हळद एकत्र मिसळल्याने शरीरात प्रतिक्रिया होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला बराच काळ अस्वस्थ वाटेल. तसेच यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.


5. जांभुळाचं लोणच्यासोबत सेवन चांगलं नाही


घरी बनवलेले आंबट-गोड लोणचे खायला कोणाला आवडत नाही. पण इथे काही फूड कॉम्बिनेशनसोबत लोणचे खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. या दोन गोष्टींच्या मिश्रणाने पोटाचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत जांभुळ खाल्ल्यानंतर १ तास लोणचे टाळले तर बरे होईल.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)