गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करु नका, यामुळे होऊ शकतं तुमचं नुकसान
आपण स्वयंपाकाशी संबंधीत किंवा जेवणाशी संबंधीत बरेच नियम ऐकतो. ज्याचा संबंध आध्यात्मिक गोष्टींशी लावला जातो. परंतु आध्यात्मिकच नाही तर यामागे काही वैज्ञानीक कारणं देखील असतात.
मुंबई : असं म्हणतात की स्वयंपाकाचे स्वत:चे काही नियम असतात आणि ते खरं देखील आहे. आपण स्वयंपाकाशी संबंधीत किंवा जेवणाशी संबंधीत बरेच नियम ऐकतो. ज्याचा संबंध आध्यात्मिक गोष्टींशी लावला जातो. परंतु आध्यात्मिकच नाही तर यामागे काही वैज्ञानीक कारणं देखील असतात. जे आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. जसे की, गरम अन्नाबद्दलच घ्या ना. आपण बऱ्याचदा घाईच्यावेळी जेवण थंड करण्यासाठी त्याला फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु असे करणे चुकीचे आहे. तुम्ही देखील असं करत असाल, तर याचे तोटे जाणून घ्या आणि ते करणं थांबवा.
सायन्स एबीसीच्या रिपोर्टनुसार, जर तुम्ही रेफ्रिजरेटरचे मॅन्युअल वाचले तर त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, त्यात गरम वस्तू ठेवू नका. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, याचा थेट परिणाम रेफ्रिजरेटरच्या काम करण्याच्या क्षमतेवर होतो. असे गरम अन्न फ्रीजवर अतिरिक्त दबाव टाकते.
विज्ञान सांगते की, जर तुम्ही असे केले तर रेफ्रिजरेटरची दीर्घकाळ काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते. कारण जेव्हा तुम्ही फ्रिजमध्ये गरम अन्न ठेवता तेव्हा ते आतील तापमान खराब करते. याचा परिणाम फ्रीजमध्ये ठेवलेल्या वस्तूंवर देखील होतो.
रिपोर्टनुसार, फ्रिजमध्ये ठेवलेल्या गरम अन्नाचं तापमानाला कमी करण्यासाठी फ्रीजच्या कॉम्प्रेसरला जास्त काम करावे लागते. हे वारंवार केल्याने कंप्रेसरचे आयुष्य कमी होऊ शकते आणि खराब होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे असे न करण्याचा सल्ला दिला जातो. तसे न करण्यामागे तज्ज्ञांनी आणखी एक कारण दिले आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फ्रीजचे तापमान थंड असते, पण त्यात गरम वस्तू ठेवल्या की हवा घट्ट होऊ लागते आणि भिंतींवर थेंब वाढू लागतात. हे पाण्याचे थेंब अन्नात जाऊ शकतात. ज्यामुळे ते अन्नात ओलावा निर्माण करतात. ज्यामुळे अन्न खराब होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे तुम्ही अशी चूक करणं टाळा.