चीन :  कोरोनानंतर (Corona virus) जगावर पुन्हा एका व्हायरसचं संकट घोंगावतंय.  चीनमध्ये (China) आता एक नव्या व्हायरसने डोकं वर काढलंय. झुनेटीक लांग्या व्हायरस असं या त्याचं नाव आहे.  (new langya virus found in china)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी कोरोना, नंतर मंकीपॉक्स आणि आता झुनोटिक लांग्या व्हायरस. एक संकट संपत नाही तोच जगात दुसरं संकट येऊन ठेपतं. संकटांची मालिकाच गेल्या तीन वर्षांपासून सुरू झालीय. 



चीनमध्ये जुनोटिक लांग्या व्हायरसनं अक्षरश: धुमाकूळ घातलाय. चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रातांत 35 जणांना या नव्या व्हायरसची बाधा झालीय. त्यानंतर चीनची आरोग्ययंत्रणा कामाला लागलीय. जुनोटिक लांग्या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातायेत. 


कसा पसरतो व्हायरस?


झुनोटिक लेंग्या व्हायरस पाळीव कुत्रे, बकरी आणि चुचुंद्री या प्राण्यांपासून पसरतो.


काय आहेत लक्षणं?


चीनमध्ये जे 35 रूग्ण आढळून आले त्यांच्यात ताप, खोकला, थकवा, भूख न लागणं, अंगदुखी, डोकेदुखी, उल्टी होणं अशी लक्षणं दिसून आली. ब-याच रूग्णांमधील पांढ-या पेशी, आणि प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत. तर काही रूग्णांचं लिव्हर आणि किडनी निकामी झालीय. 


चीनमधल्या नव्या व्हायरसनं जगावर पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजलीय. 


समाधानाची बाब इतकीच की हा व्हायरस माणासाकडून माणसांमध्ये पसरल्याचं अद्याप दिसून आलेलं नाही. मात्र कोरोना आणि मंकीपॉक्सचा अनुभव लक्षात घेता नव्या व्हायरसपासून जगाला वाचवायचं असेल तर प्रत्येकानं सावधगिरी बाळगायला हवी.