मुंबई : कोरोनावर लस आली... आपल्यापैकी अनेकांनी अजून ती लस घेतली नसली तरी लवकरच आपण ती घेऊच...पण तोपर्यंत कदाचित कोरोना व्हायरसच्या उपचारांचं स्वरूपच बदललेलं असेल...आणि कोरोना व्हायरसचे उपचार भविष्यात आणखी सोपे होतील, कसे पहा? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनावरील उपचारांसाठी आता एक अँटी व्हायरल गोळी दाखल झाली आहे. मोल्नुपिरावीर असं गोळीचं नाव आहे. या गोळीच्या वापराला इंग्लंडने सशर्त मान्यता दिली आहे. ही अँटीव्हायरल गोळी करोनाची लक्षणं कमी करतं आणि लवकर बरे होण्यास मदत करते. रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. अँटीव्हायरल गोळीला मान्यता देणारा इंग्लंड पहिला देश आहे.


मोलनूपिराविर गोळी निदान झाल्यावर दिवसातून दोन वेळा ही गोळी देण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे. या गोळीचं सेवन केल्यानंतर रूग्णालयात दाखल करण्याचा किंवा मृत्यूचा धोका पन्नास टक्क्यांनी कमी होतो, असं औषधाच्या चाचणीवरून लक्षात आलं आहे हे औषध सुरुवातीला फ्लूवरील उपचारांसाठी निर्माण करण्यात आलं होतं.


यूकेने या गोळीचे 4 लाखांहून अधिक डोस खरेदी करण्यासाठी मान्यता दिलीये. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या गोळ्यांचा पहिला साठा मिळेल. सुरुवातीला लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या दोन्ही प्रकारच्या ब्रिटीश नागरिकांना ही गोळी देण्यात येईल. यासाठी एक अभ्यास घेण्यात येणार असून या गोळीचे परिणाम अधिक चांगल्या पद्धतीने तपासता येतील. 


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोव्हिडची लक्षणं दिसायला लागल्यापासून पाच दिवसांच्या आत ही गोळी द्यावी लागेल म्हणजे ती सर्वाधिक परिणामकारक ठरेल.