मुंबई : तुम्ही तुमच्या मुलांसाठी (Children) सॅनिटायझरचा (Hand Sanitizers) वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. सॅनिटायझरचा (Sanitizers) वापर लहान मुलांसाठी प्राणघातक असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. फ्रान्समध्ये (France) यासंदर्भात संशोधन करण्यात आले आहे. सॅनिटायझरच्या वापरामुळे मुलांच्या डोळ्यावर परिणाम होणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे या संशोधनात म्हटले आहे. (No Safe for Children to Use Hand Sanitizers)


सॅनिटायझरचा अतिवापर, त्वचेला नुकसान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅन्ड सॅनिटायजमुळे डोळे झळझळणे, डोळे लाल होणे, शिवाय डोळ्यांची आग होणे अशा प्रकारच्या केसेसमध्ये वाढ होत असल्याचे समोर येते आहे. शिवाय, हे प्रमाण शहरी भागातील नागरिकांमध्ये जास्त असून अगदी लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत लोकं याबाबत तपासणीसाठी येतात. त्यामुळे सॅनिटायजर ऐवजी लहान मुलांना साबणाने हात धुण्याचा सुद्धा पर्याय डॉक्टरांनी सूचवला आहे.


लहान मुलांच्या डोळ्यांना या सॅनिटायजरच्या वापरामुळे अपाय झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या संशोधनात सांगितल्याप्रमाणं हॅण्ड सॅनिटायझरमध्ये जवळपास 70 टक्के अल्कोहोल असते. शिवाय इतर केमिकल्समुळे योग्य पद्धतीने सॅनिटायजरचा वापर न केल्याने मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. इतकेच काय तर मुलांना अंधत्व येण्याची भीती या संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे.