दाढी ठेवणे आजच्या काळात फॅशन ट्रेंडचा विषय ठरतो. अनेक पुरुष माचो दिसण्यासाठी दाढी ठेवतात. एवढंच नव्हे तर महिलांनी देखील दाढी ठेवणारे पुरुष आवडतात. मात्र आता अनेक पुरुषांच्या दाढीचे केस गळत असल्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे पुरुषांची इच्छा असूनही मुलं बियर्ड ठेवत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक लोकांना असं वाटतं की, हेअर फॉल हा फक्त डोक्याच्या केसांचा होता. मात्र तसं नाही आहे. अनेक पुरुषांच्या दाढीचे केस देखील गळतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो तसेच ही गंभीर आजाराची लक्षणे असल्याचंही सांगत आहेत. दाढीचे केस का गळतात? त्यामागचं कारण काय? 


हार्मोन्समधील बदल 
अनेक पुरुषांना टीनएजमध्ये दाढी फुटायला सुरुवात होते. यावेळेत टेस्टोस्टेरोन आणि डीएचटीचे उत्पादन शरीरात होत असते. जसे जसे वय वाढते तसे तसे हार्मोन्समध्ये बदल होताना दिसतात. 
हार्मोन्समध्ये बदल झाल्यास दाढीचे केस गळू लागतात. 


डाएट 
चुकीचा आहार आणि प्रोटीनची समस्या यामुळे देखील दाढीचे केस गळतात. असंतुलित आहार याला जबाबदार असल्याच तज्ज्ञ सांगतात. प्रोटीनमध्ये झिंक, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटामीन बी, डी, ए, के २ आणि व्हिटामिन ई दाढीच्या केसांच्या वाढीसाठी महत्त्वाची असते. 


स्ट्रेस 
दाढीचे केस गळण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे ताण-तणाव. पुरुषांच्या दैनंदिन जीवनात याचा मोठा परिणाम होताना जाणवतो. मेंदूवर ताण वाढल्यास दाढीचे केस गळायला सुरुवात होते. 


अशावेळी काय कराल? 
दाढीचे केस का गळतात याबाबत पहिली माहिती घेणे गरजेचे असते. दररोज 20 ते 30 दाढीचे केस गळणे ही अतिशय सामान्य बाब आहे. मात्र यापेक्षा जास्त केस गळत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)