मुंबई : कॅन्सर या आजाराचं नावं ऐकूनच रूग्णांचा थरकाप उडतो. व्यसन नसताना, आरोग्याची पुरेशी काळजी घेतल्यानंतरही कॅन्सर कसा बळावू शकतो? हा प्रश्न अनेकांच्या डोक्यात घोळत असतो. फुफ्फुसांचा कॅन्सर हा अशाच प्रकारचा एक कॅन्सर आहे. या कॅन्सरमध्ये रूग्णांना धुम्रपानाची सवय असल्यासच धोका बळावतो हे तुमच्याही मनात असेल तर आजच हा विचार काढून काढा. 


धुम्रपान कधीही न करणारेही कॅन्सरच्या विळख्यात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच एका अभ्यासातून पुढे आलेल्या माहितीनुसार, धुम्रपानाची सवय किंवा कधीही सिगारेट हात न लावलेल्यांमध्येही फुफ्फुसांचा कॅन्सर बळावला आहे. सुमारे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे निदान झालेले  सुमारे 50% रूग्ण हे नॉन स्मोकर आहेत. त्यामुळे धुम्रपानाची सवय नसणार्‍यांमध्येही कॅन्सरचा धोका वाढत असल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. 


नॉन स्मोकर्समध्ये कशामुळे वाढतो कॅन्सर ?


IIT दिल्ली आणि IIT कानपुरच्या अभ्यासानुसार, नॉन स्मोकर्समध्ये कॅन्सर वाढण्याचं एक कारण म्हणजे रहदारीच्या रस्स्त्याजवळ असणारं घर. घराजवळ रहदारीचा रस्ता असल्याने अशा ठिकाणी वातावरणामध्ये प्रदूषण अधिक आढळते. 


वाहनांमधून बाहेर पडणार्‍या हवेत Chromium आणि Nickel हे विषारी घटक आढळतात. यामुळे श्वासामार्गे ते शरीरात गेल्यास  Excess Cancer Risk वाढवतात. इतक्या प्रदूषित वातावरणामध्ये राहणं हे सुमारे नियमित 7 सिगारेट पिण्याच्या समान आहे. 


भारतामध्ये दरवर्षी सुमारे साठ हजार रूग्ण फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या विळख्यात अडकतात. मात्र त्यापैकी सुमारे 50% रूग्णांच्या कॅन्सरमागे प्रदुषण हे कारण आढळून आले आहे.  सुरूवातीला त्रास जाणवल्यास धुम्रपानाची सवय नसल्याने हा कॅन्सर असू शकतो असं त्यांच्या मनातही येत नाही. अनेकदा अशा रूग्णांवर सुरूवातीला टीबीचे उपचार केले जातात. मात्र कालांतराने या आजाराची गंभीरता समोर येते.  म्हणूनच फुफ्फुसाच्या कॅन्सरची '7' लक्षण वेेळीच ओळखा