मुंबई : डासांपासून पसरणारा एक धोकादायक आजार म्हणजे मलेरिया...असंच मलेरिया प्रभावित गावांमध्ये डास लोकांना चावल्यानंतर बागेत किंवा झाडाझुडुपांमध्ये तर पळून जातात का? त्याचप्रमाणे किटकनाशकांचा मच्छरांवर नेमका काय परिणाम होतोय हे पाहण्यासाठी इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने  आयसीएमआर) एक अभ्यास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अभ्यास करण्यासाठी आयसीएमआरची टीम बेरलीतील मलेरिया प्रभावित 10 गावांमध्ये सर्वे करणार आहे. अलीकडेच, नॅशनल मलेरिया रिसर्च सेंटरच्या टीमने डासांच्या बदलत्या गोष्टींवर सर्वेक्षण केलं आणि आता ICMR ने जिल्ह्यातील 10 गावांमध्ये उच्चस्तरीय अभ्यास सुरू केला आहे. आयसीएमआरची टीम देशभरातील मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित भागात डासांचा अभ्यास करतेय. आयसीएमआरची टीम आसाम आणि ओडिशामधील मलेरियाग्रस्त ठिकाणांचं सर्वेक्षण केल्यानंतर आता बरेली पुढील अभ्यास करणारे.


मलेरियाग्रस्त गावांमध्ये डासांच्या प्रवृत्तीवर बुधवारपासून अभ्यास केला जातोय. माणसाला चावल्यानंतर डास सहसा घराच्या भिंतींवर बसतात. या कारणास्तव, मलेरिया विभागाने गावांमध्ये घरोघरी डीडीटीची फवारणी केली, जेणेकरून डासांचा नाश होऊ शकेल. अनेक राज्यांमध्ये झालेल्या ताज्या अभ्यासामध्ये हे समोर आलंय की, माणसाला चावल्यानंतर जंगल आणि झुडपांमध्ये डास पळून जातात. बरेलीच्या मलेरियाग्रस्त भागात हे घडतंय का याबाबतचा ICMR टीम अभ्यास करत आहे.


संध्याकाळी मच्छरांना पकडणार


आयसीएमआरची टीम गावांमध्ये डास पकडणार आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर पकडलेल्या डासांचा जीनोम अभ्यास करण्यात येणारे. त्याचसोबत याच गावांमध्ये सकाळी सुद्धा डास पकडले जातील.


किटकनाशक किती प्रभावी याचाही अभ्यास


आरोग्य विभागाच्या टीमने मलेरियाग्रस्त भागात डीडीटी फवारणी केली. याअंतर्गत ही टीम गावागावांत घरोघरी जाते. तिथल्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढून कीटकनाशकाची फवारणी केली जाते. जेव्हा डास त्या भिंतींवर बसतात तेव्हा ते कीटकनाशकाच्या प्रभावामुळे मरतात. तर या कीटकनाशकाचाही अभ्यास केला जाणार आहे.