मुंबई : सध्या आपली जीवनशैली पूर्णपण बदलली आहे. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसतोय. रोजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे फार गरजेचे असते. पायी चालणं हा नेहमी एक उत्तम व्यायाम मानला जातो. मात्र बहुतांश लोकं चालणं याला व्यायाम मानत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालणं ही एक शारीरिक क्रिया आहे. आणि याचे बरेच फायदे आहेत. हे स्नायू, सांधे आणि हाडे मजबूत करते आणि चयापचय क्रिया वाढवण्यात मदत करते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, नियमितपणे अर्धा तास चालणे आवश्यक आहे. 


कार्डियो फिटनेस वाढतो


पायी चालण्याने तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करते. यासाठी, आठवड्यातून 5 दिवस कमीत कमी 30 मिनिटं चालणं आवश्यक आहे. तुम्हाला ही क्रिया नियमितपणे करण्याची आवश्यकता आहे.


कॅलरी बर्न होण्यास मदत


केवळ हेवी वर्कआउट्स आणि व्यायाम करून कॅलरी बर्न करू शकता असं नाही. तुम्ही चालण्याद्वारेही वजन कमी करू शकता.  किती वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही किती वेगाने तसचं किती दिवस चालत आहात यावर अवलंबून आहे.


एनर्जी बूस्ट होण्यास मदत


दिवसभर घरी बसून स्टॅमिना कमकुवत होतो. मात्र तुम्ही याची चिंता करू नका कारण काही काळ पायी चालण्याने तुम्ही उर्जेला चालना देऊ शकता. चालण्यामुळे, शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते, ज्यामुळे नॉरेपाइनफ्रिन आणि एपिनेफ्रिन यांसारख्या हार्मोन्सची पातळी वाढते.


मसल्स आणि जॉइंट्स मजबूत होतात


नियमित चालण्यामुळे शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना बळकटी मिळते. गुडघे तसंत कंबरेच्या स्नायूंना बळकट करण्याबरोबरच सांधेही मजबूत करण्यासाठी काम करतं. सपाट पृष्ठभागावर चालण्याऐवजी, किंचित उंच भागात चालणं फायदेशीर ठरेल.


ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत


आपल्याला नेहमी सल्ला देण्यात येतो की जेवण झाल्यावर झोपू नये. त्याऐवजी काही वेळ चाललं पाहिजे. खाल्ल्यानंतर पायी चालण्याने शरीरातील साखरेची पातळी कमी होते. हा एक चांगला व्यायाम आहे आणि जो आपण आपल्या दैनंदिन कामात तुम्ही समाविष्ट करू शकता