मुंबई :  नोकरी आणि कामाचा तणाव आयुष्याला हानिकारक होऊ शकतो. कामाचा जास्त तणाव घेतल्याने ६८ टक्के जणांचा मृत्यूचा धोका वाढवतो असे एका रिसर्चमध्ये समोर आले आहे. कामाचा ताण घेणं हे आपल्या शारिरीक आणि भावनिक स्वास्थ्यावर परिणाम करतं. आपली नाती आणि घरगुती आयुष्यावरही याचा परिणाम होते. नोकरीतील यश आणि अपयश यांच्यावरदेखील याचा परिणाम होतो. नोकरीच्या तणावामुळे शरीराच्या आंतरिक प्रणालींना बाधा होत असल्याने हृद्याचा आजार वाढण्याचे प्रमाण जास्त असल्याचे हार्ट केअर फाऊंडेशन (एचसीएफआय) चे अध्यक्ष डॉ. के.के. अग्रवाल यांनी सांगितले.


स्वास्थावर परिणाम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तणावग्रस्त कर्मचारी हा अपूर्ण जेवण, दारू आणि धुम्रपानाकडे जास्त वळल्याचे पाहायला मिळते. व्यायाम करणंही हे सोडून देतात. यामुळे हृदयाच्या गतीतील परिवर्तन वाढत आणि हृदय कमजोर होतं. कोर्टिसोलचा स्तर देखील सामान्याहून अधिक होत असल्याचे'ही त्यांनी सांगितले. हा एक स्ट्रेस हार्मोन असून तो नकारात्मकता उत्पन्न करतो. रक्तात जास्त कोर्टसोल असल्याने रक्त वाहिन्या आणि हृदयाला नुकसान पोहोचत. काम आणि घरामध्ये प्राधान्य देण्याचा परिणाम मानसिक स्वास्थावर होते. त्यामुळे नकारात्मक भावना वाढून नशेची सवय लागते. 


लक्षणे 


अधिक तणावामुळे चिंता, चिडचिडेपणा. चव जाणे, अनिद्रा, झोपेचे आजार, थकणं, लक्ष केंद्रीत न होणं, डोकेदुखी, पोटाचे आजार, सेक्स ड्राइव्ह कमी होणं, नशा करणं 


उपाय 


जर तुम्हाला या तणावातुन बाहेर पडायचे असल्याच सर्वांशी सकारात्मक नाती निर्माण करा. 


भरपेट नाश्त्याने दिवसाची सुरुवात करा.यामुळे कामात लक्ष लागण्यास मदत होते. झोप पूर्ण घ्या आणि झोपायच्या वेळेत काम करू नका. 


झोपण्याची वेळ एकच असेल याची काळजी घ्या. 


दररोज ३० मिनिटं शारिरीक व्यायाम करा. 


आपले शरीर आणि मानसिक आरोग्य जपण्याला प्राधान्य द्या.