मुंबई : जगातील 38 देशांमध्ये दहशत पसरवणाऱ्या कोरोनाचा Omicron प्रकाराची चिंता आता भारतालाही सतावतेय. आतापर्यंत, भारतातील 4 रुग्णांना ओमायक्रोन व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यानंतर देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका वाढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम, गुजरातमधील झिम्बाब्वेहून परतलेल्या 72 वर्षीय व्यक्तीमध्ये ओमायक्रोन प्रकाराचा संसर्ग आढळून आला. त्यानंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं आढळून आले. 


Omicron ने वाढवली भारताची चिंता


देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रवेशानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कर्नाटक आणि गुजरातपाठोपाठ आता महाराष्ट्रातही ओमिक्रॉन प्रकारामुळे चिंता वाढली आहे.


भारतात Omicronचे 4 रूग्ण 


आतापर्यंत भारतातील 4 रुग्णांमध्ये Omicron व्हेरिएंटची पुष्टी झाली आहे. कर्नाटकमध्ये 2 रुग्ण, महाराष्ट्रात 1 आणि जामनगर, गुजरातमध्ये 1 रुग्ण कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटने संक्रमित आढळले आहेत. 


देशभरात Omicron अलर्ट


भारतात ओमायक्रोन प्रकाराचे रुग्ण मिळाल्यानंतर देश अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ओमायक्रोनचा धोका लक्षात घेऊन विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचवेळी, बंगळुरूमध्ये दोन प्रकरणे आल्यानंतर कोरोनाचे नियम कडक करण्यात आले आहेत. 


देशातील अनेक शहरांमध्ये ओमायक्रोनची व्हेरिएंटची प्रकरणं समोर आल्यानंतर देशभरात दक्षता घेण्यात येतेय. दिल्लीमध्ये, ओमायक्रोन प्रकाराची चाचणी घेण्यासाठी उच्च जोखीम असलेल्या देशातून आलेल्या 15 लोकांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 8 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये सर्वांची परिस्थिती स्थिर असल्याची माहिती आहे.


बेंगळुरूमध्ये ओमायक्रोन व्हेरिएंटची दोन प्रकरणं सापडल्यानंतर, नवीन मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलीस तैनात करून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड आकारला जातोय. दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य सचिवांनी 6 राज्यांना पत्र लिहून ओमायक्रोन व्हेरिएंटच्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि अतिरिक्त दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.