Omicron Variant News : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच अनेक नियम बदलणार आहे. त्यात सर्वात मोठा बदल होम आयसोलेशनच्या (Home Isolation) मार्गदर्शक तत्त्वात करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) आज यासंदर्भात सुधारित मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे (Home Isolation New Rules) जारी केली आहेत. यानुसार पॉझिटव्ह अहवाल आल्यानंतर सात दिवस आणि सलग तीन दिवस ताप नसेल तर रुग्णाचा विलगीकरण कालावधी संपेल. तसंच यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकत नाही.


आकडेवारीनुसार, गेल्या 9 दिवसांत देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 6 पटीने वाढली आहे. ओमायक्रॉनची  (Omicron Variant) प्रकरण तीन दिवसांत दुप्पट होत आहेत. या पार्श्वभूमीवर सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांनी रुग्णालयात दाखल न होता Home Isolation मध्ये रहावं.  यासाठी नवीन होम आयसोलेशन गाइडलाइन आवश्यक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.


भारतात सहव्याधी असलेल्या रूग्णांची संख्या लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढेल. त्यामुळे होम आयसोलेशनच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी, राज्यांना नियंत्रण कक्ष सुसज्ज ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.


होम आयसोलेशनचे नियम काय आहेत
वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनची परवानगी दिली जाईल. सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच राहतील. यासाठी योग्य घरात योग्य व्हेंटिलेशन असणं आवश्यक आहे. रुग्णाला ट्रिपल लेयर मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय रुग्णाला जास्तीत जास्त द्रवपदार्थ घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एचआयव्ही बाधित किंवा प्रत्यारोपण झालेल्या आणि कर्करोगाच्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच होम आयसोलेशनमध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल.


लक्षणे नसलेले किंवा  सौम्य-लक्षण असलेले रुग्ण ज्यांची ऑक्सिजन पातळी 93% पेक्षा जास्त आहे त्यांना होम आयसोलेशनमध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल. जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षांना होम आयसोलेशनमध्ये असलेल्या सौम्य आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या सतत संपर्कात राहावे लागेल. आवश्यकता भासल्यास रुग्णाची चाचणी आणि रुग्णालयात बेड उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी राज्यांच्या नियंत्रण कक्षांवर असेल. 


डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं तसंच सीटी स्कॅन किंवा एक्स रे काढता येणार नाही, असे नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ठरवून दिले आहेत.