Foods To Eat In Diabetes: थंडीची सुरुवात झाली आहे. गोड-गुलाबी थंडी कितीही हवीहवीशी वाटत असली तरीदेखील वातावरणात गारवा जाणवायला लागल्यानंतर तब्येतीच्या कुरबुरी जाणवायला लागतात. या दिवसांत मधुमेहाच्या रुग्णांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. या दिवसांत बाजारात पोषक तत्वांनी युक्त असलेले फळं आणि भाज्या मिळतात. डायबिटीजमुळं त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा ऋतु खूपच महत्त्वपूर्ण आहे. कारण खाण्या-पिण्याच्या योग्य सवयींमुळं तुम्ही ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्याच्या दिवसात फळ आणि भाज्या पोषण तर पुरवतातच पण ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायदेशीर असतात. पेरू, संत्र आणि पालकसारखे खाद्यपदार्थ तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करा. त्याचबरोबर नियमित ब्लड शुगर लेव्हलदेखील तपासत पाहा. आज जागतिक मधुमेह दिवस आहे. हिवाळ्यात कोणते फळ आणि भाज्या खाल्ल्या पाहिजेत जेणेकरुन मधुमेह नियंत्रणात राहिल, याची माहिती घेऊया. 


पेरू


पेरूत फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपुर प्रमाणात असते. ज्यामुळं रक्तातील साखर नियंत्रणात राहते. सकाळी नाश्तात किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही पेरू खावू शकता. त्याचबरोबर संत्र एक ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फळ आहे. हे फळ शरीराला तर हायड्रेट ठेवते त्याचबरोबर शुगल लेव्हलदेखील नियंत्रणात ठेवते. 


सफरचंद आणि बेरी


सफरचंदात फायबर आणि अँटी ऑक्सीडेंटेस भरपूर असतात. जे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदतशीर असतात. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज कमीत कमी एक सफरचंद खाल्लं पाहिजे. तसंच, बेरीजमध्ये अँटी ऑक्सीडेंट्स आणि व्हिटॅमिन असतात. जे इन्सुलिनचे कार्य अधिक सक्षम करते. 


पालक


पालकमध्ये आयर्न आणि फायबर असतात. जे शरीरात इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी पालक एक चांगला पर्याय आहे. ज्यामुळं ब्लड लेव्हल नियंत्रणात राहते. पालकाचा ज्यूस, सूप किंवा भाजी बनवून तुम्ही खावू शकता. यात स्टार्च नसते आणि याचे ग्लायसेमिक इंडेक्सदेखील खूप कमी असते. ज्यामुळं ब्लड शुगरवर कोणताही चुकीचा परिणाम होत नाही. 


मेथीचे दाणे आणि भाजी दोन्हीही ब्लड शुगल नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर आहे. तुम्ही मेथीची भाजी, पराठा किंवा काढा म्हणूनही खावू शकता. त्याचप्रमाणे ब्रोकलीमध्ये कार्बोहायड्रेट आणि हाय फायबर असते. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे. 


गाजर आणि मशरुम


गाजरात असलेले बीटा कॅरोटीन ब्लड शुगर कंट्रोल करते. तुम्ही सलाड किंवा सूप म्हणून गाजर खावू शकता. गाजराचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज फक्त 50 ग्रॅम गाजर खाल्ल्याने शरीराला अनेक पोषकतत्वे मिळतात. त्याचप्रमाणे मशरुम एक लो कॅलरी आणि लो कार्ब व्हेजिटेलब आहे. जे ब्लड शुगर स्टेबल ठेवण्यास फायदेशीर आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)