या पदार्थाचं सेवन करुन कॉमेडियन भारतीने केलं वजन कमी, तुमच्याही आहे रोजच्या वापरातला
अभिनेत्रीने वजन कमी करण्यासाठी एक उत्तम युक्ती अवलंबली होती आणि त्याच वेळी तिच्या आहारावर नियंत्रणही ठेवलं होतं.
कॉमेडियन भारती सिंगचे वेट ट्रान्सफॉर्मिशन पाहून लोकांना आश्चर्य वाटल होतं. त्यानंतर ती काय खाते हे सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता होती. कॉमेडियन भारती सिंगने गेल्या वर्षी तिच्या वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. अभिनेत्रीने वजन कमी करण्यासाठी एक उत्तम युक्ती अवलंबली होती आणि त्याच वेळी तिच्या आहारावर नियंत्रणही ठेवलं होतं. अनेक मुलाखतींमध्ये तिने सांगितले आहे की ती सकाळी हळदीचे पाणी पिते. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात याच पाण्याने का करावी.?
हळदीचा वापर प्रत्येकच्या घरात केला जातो. आयुर्वेदात हळद हे आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते. हळद कोमट पाण्यात मिसळली जाते तेव्हा ते कर्क्यूमिन सक्रिय करते, ज्यामुळे हळदीला त्याचा वैशिष्ट्यपूर्ण पिवळा रंग येतो आणि त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.
पचन सुधारण्यास मदत
हळद केवळ पचन सुधारण्यास मदत करते असे नाही तर पित्ताशयाला पित्त निर्माण करण्यासाठी उत्तेजित करण्यासाठी देखील ओळखले जाते. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. त्याच वेळी, चांगले पचन चांगले चयापचय साध्य करण्यास मदत करते. हे वजन कमी करण्यासाठी आणि वजन राखण्यासाठी निरोगी चयापचयशी जोडलेले आहे.
त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर
रक्त शुद्धी
हळद रक्त शुद्ध करून रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. त्याचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात, ज्यामुळे त्वचेचा रंग समतोल होतो आणि चमक वाढते. यासोबतच ते वयाच्या आधी येणारं म्हातारपण कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे तुम्ही तरुण दिसता.
कॅन्सर रोखण्यासाठी उपयुक्त
कर्क्यूमिनच्या सर्वात लोकप्रिय आणि वैद्यकीयदृष्ट्या उपचारात्मक गुणधर्मांपैकी एक म्हणजे त्याचे कर्करोगविरोधी गुणधर्म. इतकेच नाही तर अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की कर्क्यूमिनमध्ये ट्यूमर विरोधी गुणधर्म आहेत, जे ट्यूमरच्या वाढीस मर्यादित करतात आणि कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात.
अल्झायमरमध्ये उपयुक्त
हळदीमध्ये आढळणारे कर्क्युमिन हे औषधी अल्झायमरची लक्षणे दूर करण्यासाठी ओळखलं जातं. .यातलं कंपाऊंड बीटा-एमायलोइडची निर्मिती रोखण्यास मददत करते. प्रथिने पदार्थ ज्यामुळे पेशींच नुकसान होतं ज्यामुळे हळूहळू अल्झायमर होतो.
त्यामुळे बहुगुणी हळद जी तुमच्या किचन मध्ये सहज उपलब्ध असते तिचा वापर करून तुमचं आरोग्य सुधारण्यास प्रयत्न नक्की करा ..