मुंबई : भारतात कोरोनाविरूद्ध अजून संपूर्ण लसीकरणही पूर्ण झालेलं नाही आणि अशा परिस्थितीत ओमायक्रॉन व्हेरिएंटने रूपाने देशासमोर अजून एक समस्या निर्माण झाली आहे. ओमायक्रॉनवरील प्राथमिक संशोधनात असं दिसून आलं आहे की, कोविशील्डसह सर्व लसी कोरोनाच्या या ओमायक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी नाहीत. 


या दोन लसी Omicron विरुद्ध प्रभावी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यास लस अधिक आजारी होण्यापासून संरक्षण करते परंतु त्याचा संसर्ग टाळण्यास सक्षम नाही. संशोधनात फक्त फायझर आणि मॉडर्ना लसींबद्दल चांगली बातमी आहे. बूस्टर शॉटसह फायझर आणि मॉडर्ना लसींची माहिती घेतल्यानंतर, ओमायक्रॉन व्हेरिएंट थांबवण्यात सुरुवातीला यश आल्याचं दिसलं.


रिसर्चमध्ये हा खुलासा


AstraZeneca, Johnson & Johnson या चीन आणि रशियामध्ये उत्पादित केलेल्या लसी देखील Omicron ला प्रतिबंध करण्यास सक्षम नाहीत असं प्राथमिक तपासणीत दिसून आलं आहे. जगभरात अजून मोठ्या प्रमाणात लोकांना लस मिळालेली नाही. अशा परिस्थितीत, संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने होणारी वाढ ही कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांसाठी मोठा धोका आहे. 


फायझर आणि मॉडर्ना लसी बनवण्यासाठी mRNA तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे, जे सर्व प्रकारच्या संक्रमण आणि प्रकारांपासून संरक्षण करतात.