Oversleeping: विकेंडला जास्त झोप घेताय? ओव्हरस्लिपिंगमुळे वाढतोय `या` समस्यांचा धोका
Oversleeping: आपल्या शरीराला 7-8 तासांची झोप गरजेची असते. यावेळी तुम्हाला आवश्यक असलेल्या झोपेचे प्रमाण तुमच्या आयुष्यभरात बदलत असतं. हे तुमचे वय आणि क्रियाकलाप स्तर, तुमचं सामान्य आरोग्य आणि जीवनशैलीच्या सवयींवर अवलंबून असतं.
Oversleeping: झोप ही प्रत्येक व्यक्तीच्या शरीरासाठी आवश्यक असते. अपुऱ्या झोपेमुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. अशावेळी रात्रीची झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची असते. पंरतु जर तुम्ही झोपायची पद्धत चुकीची असेल आणि तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर हा तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. जास्त झोपेचा संबंध अनेक वैद्यकीय समस्यांशी जोडलेला असतो. ज्यामध्ये मधुमेह, हृदयरोग आणि मृत्यूचा धोका वाढतो.
किती काळ झोप म्हणजे ओव्हरस्लिपिंग?
आपल्या शरीराला 7-8 तासांची झोप गरजेची असते. यावेळी तुम्हाला आवश्यक असलेल्या झोपेचे प्रमाण तुमच्या आयुष्यभरात बदलत असतं. हे तुमचे वय आणि क्रियाकलाप स्तर, तुमचं सामान्य आरोग्य आणि जीवनशैलीच्या सवयींवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, तणाव किंवा आजारपणाच्या काळात, तुम्हाला झोपेची जास्त गरज भासू शकते. जरी झोपेची गरज वेळोवेळी आणि व्यक्तीनुसार बदलते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
जास्त झोपल्यामुळे का त्रास होतो?
हायपरसोम्नियाने ग्रस्त लोकांसाठी, जास्त झोपणं ही मेडिकल कंडिशन आहे. या स्थितीमुळे, लोकांना दिवसभर जास्त झोपेचा त्रास होतो. झोपेची जवळजवळ सतत गरज असल्यामुळे हायपरसोम्निया असलेल्या अनेक लोकांना चिंता, ऊर्जेची कमतरता आणि स्मरणशक्तीच्या समस्यांची लक्षणं जाणवतात. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया ही एक समस्या आहे, ज्यामुळे लोकं झोपेच्या काळात तात्पुरतं श्वास घेणं थांबवतात. यामुळे झोपेची गरजही वाढू शकते.
जास्त झोपण्याचे आरोग्याला होणारे तोटे
डोकेदुखी (Headache)
जास्त झोपेमुळे काही लोकांना डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त वेळ झोपल्याने डोकेदुखी होऊ शकते. संशोधकांच्या मतानुसार, सेरोटोनिनसह मेंदूतील काही न्यूरोट्रांसमीटरवर झोपेचा परिणाम होतो. जे लोक दिवसा खूप झोपतात आणि रात्रीची झोपत नाहीत त्यांना सकाळी डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
मधुमेह (Diabetes)
अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलंय की, प्रत्येक रात्री खूप वेळ झोपणं किंवा पुरेशी झोप न घेतल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
स्थूलपणा (Obesity)
खूप किंवा खूप कमी झोपल्यानेही तुमचे वजन वाढू शकतं. एका अभ्यासात असं दिसून आलंय की, जे लोकं दररोज रात्री 9 किंवा 10 तास झोपतात त्यांना सहा वर्षांच्या कालावधीत 7 ते 8 तास झोपलेल्या लोकांपेक्षा 21% जास्त लठ्ठ होण्याची शक्यता असते.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून झी २४तास याची खातरजमा करत नाही. आहारविषयक बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )