अतिविचाराने उद्भवतात आरोग्याच्या `या` गंभीर समस्या!
अतिविचार किंवा चिंता यामुळे समस्या कमी होणार नाही तर उलट आजारपण वाढेल.
मुंबई : आपण आधुनिक होत आहोत, प्रगतीपथाकडे मार्गक्रमण करत आहोत. यामुळे आपल्यामध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा सुरु जली आहे. त्यामुळे प्रत्येकाला कमी वेळात यशस्वी व्हायचे आहे. यासाठी प्रत्येकजण अनेक अडचणींना सामोरे जात प्रयत्न करत आहे. पण या सगळयामध्ये एखाद्या गोष्टीचा अधिक विचार करणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरत आहे. घर-परिवार, नोकरी किंवा कोणत्याही मुद्दयावर गरजेपेक्षा अधिक विचार करणे त्रासदायक ठरेल. अतिविचार किंवा चिंता यामुळे समस्या कमी होणार नाही तर उलट आजारपण वाढेल. तज्ञांनुसार, अतिविचार केल्याने आपल्या शरीरात कोर्टिसोल हार्मोन्स वाढू लागतात. ज्याचा आरोग्यावर परिणाम होतो.
# अतिविचाराचा परिणाम तुमच्या कामावरही होतो. कारण कोर्टिसोल हार्मोनमुळे मेंदूच्या कनेक्टिव्हीटीवरही परिणाम होतो.
# अधिक विचार केल्याने तणाव, चिंता, मुड स्विंग्स यांसारख्या मानसिक समस्या उद्भवतात. त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. यामुळे पोटात जळजळ, बोवेल सिंड्रोम, गॅस्टिक सिक्रेशन, आतड्यांची अकार्यक्षमता यांसारखअया समस्यांना आमंत्रण मिळते.
# अतिविचार किंवा चिंता याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो. छातीत दुखणे, चक्कर येणे, निद्रानाश यांसारख्या समस्या वाढतात. सातत्याने चिंता करणे, तणाव, अतिविचार याचा परिणाम त्वचेवरही होतो.
# चिंतेमुळे भावनात्मक तणाव वाढतो. त्यामुळे सोसायसिस, अटॉपिक, डर्मेटाईटिस, खाज यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. तणावामुळे शरीराला सुजही येते. रोगप्रतिकारकक्षमतेवरही याचा परिणाम होतो.
# अतिविचाराने मेंदूत कोर्टिसोल हार्मोन वाढते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा नष्ट होते. अतिविचाराने पचनक्रियेच्या समस्या, ब्लड प्रेशर, मेटाबॉलिक डिसऑर्डर, हृदयविकार यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो.